बलात्कारा पिडीतेच्या आरोपीची शिक्षामाफकेल्याविरोधात,सह्याची मोहिम.

वंचित बहुजन आघाडीची केज शहरात मोहीम.

बिलकीस बानोला न्याय मिळाला पाहिजे
—————————————-
गुजरात मध्ये 3 मार्च 2002 ला जातीय दंगली भडकल्या होत्या त्या मध्ये 2000 लोकांची हत्या झाली होती असे सरकारी आकडे सांगतात पण प्रत्यक्षात मरनारांची संख्या हि त्या पेक्षा जास्त होती.
अशा परिस्थितीत बिलकीस बानो आपल्या परिवारासोबत आपला जिव वाचवन्या साठी एका शेतात लपली पण हत्यारबंद 30 ते 40 दंगलखोरांनी परिवारा सोबत जिव वाचन्या साठी शेतात लपलेल्या बिलकीस बानोला पाहाताच त्यांच्या परिवारावर हल्ला चढावला हल्ले खोरांनी बिलकीस बानो व सोबत असलेल्या चार महीलांवर बलत्कार केला त्या मध्ये बिलकीस बानोची आई देखील होती. त्या वेळेस तिथ दंगल खोरांनी बिलकीस बानोच्या परिवारातील सात झनांनची निघृन हात्या केली त्या मध्ये बिलकीस बानोची मुलगी पण होती. नंतर बेशुद्ध झालेली बिलकीस बानोला 3 तासा नंतर शुध्दी वर आली.जेव्हा ति शुध्दी वर आली तेव्हा तिच्या शरिरावर एकही कपडा नव्हता आणि परिवारातील लोकांचे मृत्यू देह तिच्या जवळच पडलेले होते.
शुध्दीवर आल्या नंतर तिनी जसे तसे पोलिस स्टेशन गाठले.
त्यानंतर ह्या प्रकरणात 11जनांनवर आरोप ठेवुन त्याना जेल मध्ये डामन्यात होते पण 15 आँगस्ट 2022 रोजी गुजरात सरकारने त्यांना गोध्रा जेल मधुन सोडून देन्यात आले. त्या मुळे न्यायाच्या अपेक्षेत आसलेल्या बिलकीस बानोला पुन्हा अन्यायाला सामोरे जावा लागतले आहे. पिडीतीला न्याय मिळावा म्हणुन
वंचित बहुजन आघाडीच्या* वतिने राज्य भर सह्याची मोहिम राबवली जात आहे.
त्याचाच एक भाग केज शहरात सह्याची मोहीम राबविण्यात आली
गुजरात सरकार ने बिलकीस बानो प्रकरणात कोर्टाने ठोठावण्यात आलेली सजा माफ करून जेलमधून सोडले त्या विरोधात ॲड.बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी सर्वोच्च न्यायालयाला बिलकीस बानो प्रकरणात निवेदना द्वारे गुजरात सरकार ने आरोपीस सोडून जो निंदनीय प्रकार केला आहे त्या साठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सह्याचे निवेदन दिले जाणार आहे.त्या साठी आज मौलाना आझाद चौकात, केज शहर वंचित बहुजन आघाडी कडुन सह्याची मोहिम राबविण्यात आली व हजार लोंकाच्या सह्या घेण्यात आल्या. तसेच हा उपक्रम आठ दिवस चालणार आहे.असे वंचित बहुजन आघाडी केज शहर यानी कळवले आहे व मोठ्या प्रमाणात यात सहभागी होण्याचे आव्हान केले आहे.या वेळेस.जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, जिल्हाउपाध्यक्ष धनराज सोनवणे,जिल्हा संघटक प्रा बळीराम सोनवणे शहर अध्यक्ष बाबासाहेब अंबादास मस्के,शहर उपाध्यक्ष उत्तम वाघमारे,डाॅ.प्रभाकर ठोके.शहर सचिव सलीम तांबोळी,शहर महासचिव संतोष वळसे नाजर सय्यद सर्व वंचित पदाधिकारी उपस्थित होते.

