• Wed. Apr 22nd, 2026

शहरात घाणीचे साम्राज्य; कचऱ्याचा टेंडर फक्त कागदावरच!

Bybaba maske

Nov 20, 2022

शहरात घाणीचे साम्राज्य; कचऱ्याचा टेंडर फक्त कागदावरच!

नवीन गुत्तेदारावर सि.ओ मेहरबान का?

रोखठोक वार्ताहर

बीड शहर समस्यांचे माहेर घर बनले असून नागरिकांना दररोज किती तरी संमेश्यांना सामोरे जावई लागत आहे जवळपास एक वर्ष झाले प्रशासन बसून लोकांना प्रशासन बसल्यावर एक अशी ची क्रेन दिसली होती परंतु बीड शहर प्रशासन बसून देखील सुधारण्याचा नाव घेत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. शहरातील नागरिकांना रस्त्यासाठी, नाल्यांची साफसफाई करण्यासाठी,पिण्याच्या पाण्यासाठी, आणि कचरा साफसफाई करण्यासाठी मोठी कसरत करावे लागत आहे.

शहरातील स्वच्छता विभागाकडून कचरा जमा करण्यासाठी एका प्रायव्हेट कंपनीला टेंडर एक नोव्हेंबर रोजी दिला गेला परंतु वीस दिवस उलटूनही त्या कंपनीची कोणतीही यंत्रणा शहरात पाहण्यास मिळत नाही यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पाहण्यास मिळते. वीस दिवस टेंडर फक्त कागदावरच का?सिओंना हे दिसत नाही का? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकाकडून विचारले जात आहेत. त्या कंपनीला यंत्रणा आणण्यासाठीच 20 दिवस लागत असतील तर पुढे ते शहरात कशी स्वच्छता करेल याचा अंदाज आपण लावू शकतो. शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या टेंडर चालकाला यंत्रणा आणण्यासाठी सांगावे अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

baba maske

Related Post

ऽऽबस झाल्या घोषणांच्या रिकाम्या तुताऱ्या; आता हव्यात कार्यान्वित मुताऱ्या..! “सामुदायिक मूत्रविसर्जन” आंदोलनाची चर्चा जोरात
केज नगरपंचायतीचे दुर्लक्ष; नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सोडल्याचा आरोप. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याला १० दिवस उलटले; अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कुत्र्याने ४० नागरिकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते
केजमध्ये ‘बुद्धंम शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे भव्य आयोजन फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन – भाई मोहन गुंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!