• Sun. Apr 19th, 2026

भांडण सोडायला गेला आणि मार खाऊन आला!!

Bybaba maske

Nov 26, 2022

भांडण सोडायला गेला आणि मार खाऊन आला!!

रोखठोक वार्ताहर 

भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तिस चापटाने, लाथा बुक्यांनी, स्टीलच्या पाण्याने मारहान करूण दुःखापत केली गुन्हा दाखल

सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील तांदळ्याचीवाडी येथील राम भगवान तांदळे , पांडुरंग किसन आव्हाड रा. तांदळ्याचीवाडी यांचे एका सोबत दि 25 नोव्हेंबर रोजी सांय 07 वाजता साळेगाव च्या जवळ पुलावरती भांडणे सुरू असताना लक्ष्मण रामचंद्र तांदळे वय 50 वर्ष व्यवसाय शेती रा.तांदळ्याचीवाडी हे भांडन सोडविण्यास गेले असता पांडुरंग किसन आव्हाड याने शिवगाळ करुण चापट, मारून लाथाबुक्याने मारहान केली तर राम भगवान तांदळे याने स्टीलच्या नटबोल्ट खोलयचे पान्ह्याने कपाळावर मारून दुःखापत केली म्हणुन लक्ष्मण रामचंद्र तांदळे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात राम भगवान तांदळे व पांडुरंग किसन आव्हाड यांचे विरुद्ध गुरन.541/2022 कलम324,323,504,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोना. काळकुटे करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!