सुर्यकांत उर्फ बाबा पाटील यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुखंद निधन.
रोखठोक वार्ताहर
केज शहरातील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पुरुषोत्तम पाटील यांचे वडील बंधू वकीलवाडी भागात वास्तव्यास असणारे सूर्यकांत उर्फ बाबा पुरुषोत्तम पाटील यांचे हृदयाविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.मृत्यूसमयी त्यांचे वय ५५ वर्षे होते.शहरातील सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व असलेले बाबा पाटील हे मागच्या दोन दिवसांपासून आजारी होते.त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.परंतु उपचारादरम्यान दि.२६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ :०० वाजण्याच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणी त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचाअंत्यविधी शनिवारी दुपारी आंबेजोगाई येथील बोरुळ स्मशानभुमीमध्ये शोकाकुल वातावरणात करण्यात आला.