• Wed. Jun 3rd, 2026

९ महिन्यांच्या गरोदर आमदार नमिता मुंदडा मंत्रालयातील बैठकांना उपस्थित…

Bybaba maske

Nov 30, 2022

९ महिन्यांच्या गरोदर आमदार नमिता मुंदडा मंत्रालयातील बैठकांना उपस्थित…

रोखठोक वार्ताहर 

केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा या गरोदर असतानाही मंत्रालयातील बैठकांमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्रालयात खरीप पीकविमा अपील अर्जाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक होती.

या बैठकीला नमिता मुंदडा यांनी या परिस्थितीतही उपस्थित राहून मतदारसंघातील जनतेच्या अडचणी सोडविण्याला आपले प्राधान्य असल्याचे दाखवून दिले. दरम्यान,बैठकीत समितीच्या समोर कंपनीने पूर्व सूचना देण्यासाठी अपुरी व दोषपूर्ण यंत्रणा राबविल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पूर्वसूचना देता आल्या नाहीत.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एन.डी आर.एफ च्या स्थानिक पंचनामांच्या आधारे पीक विमा देण्यात यावा व तालुका तक्रार निवारण समिती व जिल्हा तक्रार निवारण समिती यांनी इतर सर्व तालुक्यांचा अहवाल ताबडतोब शासनास सादर करावा,सोबतच तालुका तक्रार निवारण समितीने शेतकऱ्यांचा तक्रारीवर सुनावण्या घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी या बैठकीत केल्याचे समजते.

मागील गरोदरपणातही नमिता मुंदडा यांनी आठ महिन्याच्या गर्भवती असतानाही सभागृहात येऊन ही कामकाजात सहभागी झाल्या होत्या . विशेष म्हणजे त्या गरोदर असताना कामकाजात सहभागी होणाऱ्या पहिल्याच महिला आमदार ठरल्या होत्या.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!