• Sat. Apr 25th, 2026

साई सेवा महिला पतसंस्थेने मयताच्या पत्नीस दिला दोन लाखाचा धनादेश

Bybaba maske

Dec 10, 2022

साई सेवा महिला पतसंस्थेने मयताच्या पत्नीस दिला दोन लाखाचा धनादेश

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरातील नावारूपाला आलेली साई सेवा महिला सहकारी पतसंस्था केज शहरातील छोटे व किरकोळ व्यापार्‍यांचा आधार म्हणून गेली आठ वर्षे झाले साई सेवा महिला पत संस्था काम करत आहे म्हणुन पतसंस्थेनी आज पर्यत वेगवेगळ्या माध्यामातून गरजू वतांना आथिर्क मदत केली आहे कोरोना काळात पोलीस बांधावाना नास्ताची सोय केली होती पतसंस्थेनी कर्जदार ग्राहकांचा अपघाती विमाही सुरू केला आहे. पतसंस्था शहरातील छोटया व्यापार्‍यांना सहज व तात्काळ कर्ज देण्यात तत्पर असते पंत संस्थेने असेच एक दोन लाख रुपयांचे कर्ज केज तालूक्यातील साळेगांव येथील रहिवाशी काशीनाथ राऊत यांना दिले होते कर्ज देते वेळी पंत संस्थेने राऊत यांच्या कर्जापोटी ४०० रुपयांचा विमा न्यु इंडीया इन्सुरश कंपनी काढण्यात आला होता मागील १८/४/२०२२ रोजी काशीनाथ राऊत व त्यांच्या पत्नी मोटर सायकलवरून प्रवास करीत असतांना त्यांना ट्रॅक्टर चा धक्का लागून अपघात झाला व ते मयत झाले ही महिती कळताच पंत संस्थेचे शाखा व्यवस्थापक दत्तात्रय गाढवे यांनी विमा कंपनीकडे पाठपुरावा करून मयतच्या वारसदार पत्नी श्रीमती रत्नमाला काशीनाथ राऊत यांना दोन लाखाचा विमा मंजुर करुन घेतला आज दिनांक १०/१२/२०२२ रोजी पंतस्थेच्या अध्यक्ष सौ नंदाताई छगनराव अंधारे , उपअध्यक्ष सौ विद्याताई गणेश डूबे संचालिका सौ मनिषाताई दत्तात्रय गाढवे , सौ विद्या ताई दिपक तपसे यांच्या हस्ते दोन लक्ष रक्कमेचा धनादेश श्रीमती रत्नमाला काशीनाथ राऊत यांना सत्कारीत करून देण्यात आला यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले व संचालक मंडळासह कर्मचारी यांचे आभार मानले

या कार्यक्रमास छगन अंधारे, गणेश डूबे , भारत जाधव , दिपक तपसे , नंदकुमार राऊत , शाखा व्यवस्थापक दत्तात्रय गाढवे , रामराजे तपसे , खौरे अमोल , विनायक जाधव ‘ तसेच पत्रकार दिनकर राऊत , गौमत बचुटे , महादेव दळवे , रमेश गुळभिले , सह पंत संस्थेचे ग्राहक व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!