मोबाईल काढून घेऊन मारहाण करणारे तिघे पोलिसांनी घेतले ताब्यात
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- पिकांना पाणी देऊन घराकडे परत येत असलेल्या एकाला तिघांनी अडवून त्यांना मारहाण करून खिशातील मोबाईल काढून घेऊन मारहाण केल्या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात एका तरुणीचाही समावेश आहे.
या बाबत माहिती अशी की, रविवार दि. २२ रोजी संजयकुमार तपसे हे त्यांच्या चंदन सावरगाव येथील शेतातील पिकांना पाणी देऊन केज येथील त्यांच्या घराकडे येत होते. रात्री ११:४५ वा. च्या सुमारास ते वसंत महाविद्यालयाच्या पाठीमागील रस्त्याने मोटार सायकली वरून येत असताना वेळी दिपाली उर्फ राणी मानिक गायके, फिरोज शेख आणि प्रीतम चौव्हान हे तिघे बसलेले होते. संजयकुमार तपसे यांना फिरोज शेख आणि प्रीतम चौव्हान आणि अडवून मोटारसायकल थांबवायला लावुन मोटारसायकलचे हॅन्डल धरले. प्रितम चौहान याने त्यांच्या गालामध्ये चापटाने मारहाण केली तर फिरोज शेख याने त्यांच्या खिशातील मोबाईल हिसकावुन घेतला. त्याने तो मोबाईल राणी माणिक गायके हिच्याकडे दिला. नंतर त्या तिघांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. जर कोणाला काही सांगितलेस तर तुला जिवंत ठेवणार नाही म्हणुन धमकी दिली.
या प्रकरणी संजयकुमार शिवाजी तपसे यांनी दि. २३ जानेवारी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून दिपाली उर्फ राणी मानिक गायके, फिरोज शेख आणि प्रीतम चौव्हान यांच्या विरुद्ध गु. र. नं. ३२/२०२३ भा. दं. वि. ३२७, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राम यादव हे करीत आहेत.