एसटीतून उतरत असताना प्रवाशाचा हृदयाविकाराच्या झटक्याने मृत्यू
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- एसटी बस मधून खाली उतरताना एका वयोवृद्ध प्रवाशाला हृदयाविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की वरपगाव येथील शेषराव नारायण बनसोडे वय (७५ वर्ष) हे मंगळवार दी. २४ जानेवारी रोजी वरपगाव-केज गाडीने क्र. (एम एच-३०/बी एल-०१२५) प्रवास करीत होते. ते ६:३० वा दरम्यान केज बस स्टँडवर उतरत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी गाडीचे वाहक तांदळे आणि चालक लोकरे यांनी ही माहिती तात्काळ वाहतूक नियंत्रक जगदीश चिक्ची यांना दिली. त्या नंतर जगदीश चिक्ची यांनी तात्काळ ही माहिती पोलीसांना देऊन आणि रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. तसेच यावेळी बस स्टँडवर उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रा. विनोद गुंड, चंद्रकांत मस्के, दिलीप गवळी आणि दिलीप बनसोडे यांनी त्यांना मदत केली.
दरम्यान मयत शेषेराव बनसोडे यांचा मुलगा संतोष बनसोडे हा कुटुंबासह उस तोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर गेले असल्याने ते त्यांच्याकडे जाण्यासाठी केजकडे येत होते. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच वरपगाव येथील त्यांचे पुतणे माणिक बनसोडे यांनी केज येथे येऊन शेषेराव बनसोडे यांचा मृतदेह गावी घेऊन गेलेअसल्याची माहिती मिळाली आहे.