• Sat. Apr 18th, 2026

संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने रविवारी होणार तालुकास्तरीय शालेय विद्यार्थी नृत्य स्पर्धा प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.

Bybaba maske

Jan 27, 2023

संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने रविवारी होणार तालुकास्तरीय शालेय विद्यार्थी नृत्य स्पर्धा

रोखठोक न्युज वार्ताहर 

प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.

 

केज: केज तालुका संघर्ष पत्रकार संघ केज च्या वतीने तालुका स्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन 29 जानेवारी 2023 रोजी येथील पंचायत समितीच्या प्रांगणात सायंकाळी 5 ते रात्री 10 यावेळेत करण्यात आले असून या स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवला आहे. तरी कार्यक्रमास राजकीय नेते शासकीय अधिकारी कर्मचारी यांची उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. केशव महाराज शास्त्री तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे रमेश आडसकर तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बजरंग सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुदंडा अदित्य पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रेषकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गलांडे व सर्व सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून केज संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याही वर्षी केज तालुक्यातील गुणवंत कलाकारांना आपली कला सादर करता यावी यासाठी 5 वी ते 10वी या वयोगटातील विदयार्थी मुलामुलींसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जवळपास प्रत्येक शाळेने सहभाग नोंदवला आहे. प्रतेक शाळेला एक गीतावर आपले नृत्य सादर करता येणार आहे. तर यात तीन प्रथम दुतिय आणि तृतीय असे बक्षीस देण्यात येणार आहेत. पहिल्या येणाऱ्या गीतासाठी पारितोषिक स्मृतिचिन्ह ७७७७ तर दुतीय गीतासाठी पारितोषिक स्मृतिचिन्ह ५५५५ तर तृतीय पारितोषिक ३३३३ असे देण्यात येणार आहे. विजेत्या व उपविजेत्या शाळांना आकर्षक बक्षीषे, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. तालुक्यातील चांगल्या कलाकारांना आपल्या शाळेच्या व्यतिरिक्त सार्वजनिक रंगमंचावर आपली कला सादर करण्याची संधी संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने मिळाली आहे. त्यामुळे कलाकारांची कला पाहण्याची संधी कोणीही सोडू नये असे आवाहन संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!