केज शहरात मोटारसायकल चोराचा सुळसुळाट…गाडी कोठे लावून कामाला जायचे का,गाडीवर लक्ष ठेवायचे? या संभ्रमात आहेत.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरात मोटारसायकल चोरानी उच्छाद मांडला आहे.गेल्या महिन्यां भरा पासुन शहरात मोटारसायकल चोरीला जात आहेत.प्रत्येक सी सी टिव्ही वर चोरांची छबी दिसत असुन ही चोर सापडत नसल्या कारणाणे, नागरिकात आश्चर्य दिसून येत आहे.गेल्या सोमवारी रामानंद जाधव यांची मोटारसायकल नंबर MH 14 JN 4321 स्पेल्डंर शाहू बँक केज येथून सीसी टिव्ही त कैद झालेली व आज MH 25 AC 7595 असलम मोहमद शेख यांची शारदा इंग्लिश स्कूल येथून चोरीस गेली त्या आगोदर काळे यांची गाडी गेली पोलीस एफ आय आर करून घेतात पण तपास लागत नसल्या कारणाणे नागरिक भयभीत झाले असून गाडी कोठे लावून कामाला जायचे का,गाडीवर लक्ष ठेवायचे? या संभ्रमात आहेत.