• Sat. Apr 18th, 2026

शिक्षक मतदार संघा साठी केज तालुक्यात मध्ये ९२.८६% मतदान.चुरशीची लढाई होणार 

Bybaba maske

Jan 30, 2023

शिक्षक मतदार संघा साठी केज तालुक्यात मध्ये ९२.८६% मतदान.चुरशीची लढाई होणार 

रोखठोक न्युज 

होळ केंद्रावर सर्वात जास्त तर हनुमंत पिंप्रीत सर्वात कमी मतदान

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत ९२.८६% मतदान झाले आहे.

केज तालुक्यात केज, विडा, होळ, युसुफवडगाव आणि हनुमंत पिंप्री हे पाच मतदार केंद्र असून या पाच मतदान केंद्रावर एकूण ९६६ (पुरुष ७९५ आणि स्त्री १७१) एवढे मतदान आहे. आज सकाळी मतदान सुरू झाल्या पासून दुपारी ४:०० वा. पर्यंत ८९७ एवढे मतदान म्हणजे ९२.८६% एवढे मतदान झाले आहे.

या मतदानात ७९५ पुरुष मतदारा पैकी ७४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर १७१ स्त्री मतदारांपैकी १४९ स्त्री मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.

हनुमंत पिंप्री येथील मतदान केंद्रावर केज तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच ९०.५५% तर होळ येथील मतदान केंद्रावर सर्वात जास्त म्हणजे ९६.२५% मतदान नोंदविण्यात आले.

केज तालुक्यातील पाचही मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!