• Fri. Jun 5th, 2026

केज-बीड रोडवर पीक-अप आणि कारचा भीषण अपघात :अपघातात एक ठार

Bybaba maske

Jan 31, 2023

केज-बीड रोडवर पीक-अप आणि कारचा भीषण अपघात :अपघातात एक ठार

याच अपघातस्थळी एक वर्षा पूर्वी झालेल्या अपघातात वडिलांचाही मृत्यू

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे,/केज :- केज-बीड महामार्गावर सारुळ फाट्यावर झालेल्या पीक-अप आणि कारच्या अपघातात पिकअप चालकाचा मृत्यू झाला.

या बाबतची अधिक माहिती अशी की, मंगळवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वा. च्या दरम्यान महेश बहादूर पुरी वय (२५ वर्ष) हा पिक-अप क्र. (एमएच-२३/ एच-९०३०) चालवीत सारुळ कडून केज-बीड या महामार्गाने नांदूर फाट्याकडे जान्यासाठी वळत असताना त्याला बीडकडून केज मार्गे धारूरकडे जात असलेल्या भरधाव वेगाने येणाऱ्या कारने क्र. (एमएच-२५/आर/७०१२) ने जोराची धडक दिली. पिकअप रस्त्याच्या कडेला पलटी झाले. यात पिक-अप चालक महेश बहादूर पुरी वय (२५ वर्ष) याच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघाता नंतर त्याला खाजगी वाहनाने बीडकडे दवाखाण्यात घेऊन जात असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने सरकारी वाहनाने पोलीस नाईक अशोक मेसे, शेख रशीद आणि हनुमंत गायकवाड हे घटनास्थळी हजर झाले.
—————————————————–
*दोन वर्षात वेगवेगळ्या अपघातात बाप-लेकाचा याच रस्त्यावर बळी ! :-* या अपघातातील मृत्यू पावलेला महेश पुरी याच्या दि.२२ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ३:०० वा च्या दरम्यान महेंद्रा एक्सयुव्ही कार व मोटारसायकल मध्ये झालेल्या अपघातात नामदेव ढाकणे, आप्पाराव बापूराव ढाकणे वय (८० वर्ष) , सुंदर नामदेव ढाकणे वय (५३ वर्ष) आणि बहादूर राजाभाऊ पुरी वय (४८ वर्ष) सर्व रा. सारुळ या तिघांचा मृत्यू झाला होता. त्यात महेश पुरी याचे वडील बहादूर पुरी यांचाही समावेश होता.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!