थकित विजबीला मुळे केज शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ाची वीज तोडली, गेल्या चार दिवसांपासून शहरात ठणठणाट. नगरपंचायत नेहमी प्रमाणेच भोपळ्यात बी आसल्या सारखी शांत.
थकित विजबीला मुळे केज शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ाची वीज तोडली, गेल्या चार दिवसांपासून शहरात ठणठणाट. नगरपंचायत नेहमी प्रमाणेच भोपळ्यात बी आसल्या सारखी शांत.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहराला धनेगाव येथून पाणी पुरवठा होतो त्या साठी सोनीजवळा येथी पाणीपुरवठा व शुद्धीकरण केंद्र आहे. याच जल शुद्धीकरण केंद्राची वीज गेल्या चार दिवसांपासून थकबाकी न भरल्या मुळे विज पुरवठा महावितरण ने तोडली आहे.तरिही केज नगरपंचायत हातावर हात धरून केजच्या नागरीकाची फजिती बघण्यात मश्गुल आहे.कारण गेल्या तीन महिण्या पुर्वीच विज पुरवठा थकित वीज बीला मुळे तोडला होता.थोडे पार थकित बील भरून वीज पुरवठा तात्पुरत सुरळीत झाला होता.तरीही नगरपंचायत चा हलगर्जी पणा केज च्या नागरीकांना सहन करावा लागतो कारण कोणतीही वीज तोडताना नगरपंचायत ला तसी नोटीस दिली जाते पण नगरपंचायत च्या सत्ताधारी नेत्याच्या मश्गुल पणा मुळे केज च्या नागरीकांचे हाल होत आहेत यास नगरपंचायत प्रशासन दोषी आहे असे जनमानसात भावना आहे.कारण जर थकित पैसे भरायचे नसतील तर यांनी आगोदर नागरिकांना पाण्याची काटकसरी ने वापर किंवा पर्यायी व्यवसथे बदल सांगायला हवे पण चार दिवसांपासून वीज कट झाली तरी नगरपंचायत व नागरिकांना अंधारात ठेवले व आपली मनमर्जी चालू ठेवली या बाबतीत केज नगरपंचायत विरोधात प्रचंड असंतोष केज च्या नागरिका मध्ये दिसुन येत आहे.