• Sun. Apr 19th, 2026

पंकज कुमावत यांची मटका अड्ड्यावर कारवाई १ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त तर २१ इसमावर गुन्हे दाखल  

Bybaba maske

Feb 4, 2023

पंकज कुमावत यांची  मटका अड्ड्यावर कारवाई १ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त तर २१ इसमावर गुन्हे दाखल

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- सहाय्य पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी बीड येथील मटका अड्ड्यावर कारवाई करून २१ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७२ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

दि. ४ फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत अशी मिळाली की, बीड शहरात बस स्टँड समोर राजधानी हॉटेलच्या पाठीमागे, यशराज हॉटेलच्या पाठीमागे व धानोरा रोड येथे अवैधरित्या मटका चालू असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील त्यांच्या पथकातील पोलीस आमलदार यांच्या दोन पथके तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

 पोलीस पथकाने बीड शहरातील बस स्थानक येथे राजधानी हॉटेलच्या पाठीमागे दुपारी २:४५ वा. छापा मारून ८ इसमना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून कल्याण मटका जुगाराची साहित्य व नगदी रोख रक्कम असा एकूण ६५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर यशराज हॉटेलच्या पाठीमागे व धानोरा रोड येथे दुपारी ३:१० वा पोलुस पथकाने छापा मारून त्या ठिकाणाहून ९ इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून नगदी व कल्याण मटका जुगाराचे साहित्य असा एकूण ७२ हजार ७१० रुपये असा मुद्देमाल जप्त केला.

या तिन्ही ठिकाणच्या मटका अड्ड्यावरील कारवाईत पंकज कुमावत यांच्या पथकाने नगदी रोख रकमेसह एकूण १ लाख ३८ हजार २४० रु मुद्देमाल ताब्यात घेत २१ जणांच्या विरुद्ध कारवाई केली.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, बीड अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, बीड सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली त्याचे पथकाथील पोलीस अमलदार बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे, विकास चोपणे, अनिल मंदे, दिलीप गित्ते, संजय टुले आणि सचिन अहकारे यांनी केली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!