गौतम बचुटे/केज :- बीड केज हाय वे वरील मस्साजोग येथील एका हॉटेल समोर उभी केलेली एका प्राध्यापकाची मोटार सायकल चोरी गेली.
प्रा. अशोक रावसाहेब भोसले यांनी दि. ४ फेब्रुवारी रोजी केज बीड हाय-वे वरील मस्साजोग येथील हॉटेल समोर उभी केलेली काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्र. (एम एच-४४/ ए-८०१) ही सायंकाळी ६०० वा. च्या दरम्यान चोरीला गेली आहे.
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ६१/२०२३ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.