• Sun. Apr 19th, 2026

दारू पाजून कुऱ्हाड व चाकूने मारहाण

Bybaba maske

Feb 5, 2023

दारू पाजून कुऱ्हाड व चाकूने मारहाण

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- दारू पाजून कुऱ्हाडीने व चाकुने वर करून रक्तबंबाळ केल्याची घटना केज पोलीस ठाणे हद्दीत घडली असून दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील एकुरका येथील विनोद अरुण केदार याला दि. १ फेब्रुवारी रोजी साहेबराव फुलचंद नागरगोजे याने दारू पाजून सायंकाळी ६:०० वा. च्या दरम्यान लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच डोक्यात कुऱ्हाडीने मारुन रक्तबंबाळ करुन कुऱ्हाडीचे लाकडी दांड्याने पाठीत, हाताला, कंबरेला व मांडीला पायाला मारुन जबर मुक्का मार दिला आणि चाकुने उजव्या पायाच्या पोटरीत भोकसुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या धमकी दिली.

या प्रकरणी विनोद अरुण केदार याच्या तक्रारी वरून दि. ४ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात साहेबराव फुलचंद नागरगोजे व त्याची पत्नी भाग्यश्री साहेबराव नागरगोजे यांच्या विरुद्ध गु. र. नं. ६२/२०२३ भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक उगलमुगले हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!