• Sun. Apr 19th, 2026

रस्त्यावर बेशिस्त वाहने उभी करणाऱ्या विरुद्ध  पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे ॲक्शन मोडवर !  

Bybaba maske

Feb 5, 2023

रस्त्यावर बेशिस्त वाहने उभी करणाऱ्या विरुद्ध  पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे ॲक्शन मोडवर !

चार वाहना विरुद्ध वाहतूक शाखेची कारवाई

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- केज शहरात सर्वजनिक रस्त्यावर वाहने उभी करून रहदारीस व लोकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या विरुद्ध केज पोलीसांच्या वाहतूक शाखेने कंबर कसली असून चार वाहन विरुद्ध कारवाई केली.

या बाबतची माहिती अशी की, केज पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे नितीन जाधव आणि आवेज शेख यांनी दि. ४ फेब्रुवारी रोजी केज शहरातील मुख्य रस्त्यावर बेशिस्त पद्धतीने वाहने उभी करून रहादरीस अडथळा निर्माण करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या वाहन चालका विरुद्ध कारवाई सुरू केल्या आहेत.

अशा प्रकारे वाहन रस्त्यावर उभे करणाऱ्या रविन्द्र बंडु जाधव (रा. लव्हुरी) ऑटो रिक्षा क्र.(एम एच-२३/एक्स-४३२७), ऋषीकेश बाळासाहेब पटाईत (रा. केवड) ऑटो रिक्षा क्र. (एम एच-२३/एक्स-२९९७), आकाश विष्णु राऊत वय 25 वर्षे रा. कानडीमाळी ऑटो रिक्षा क्र. (एम एच-२३/एक्स-३१३६) आणि लालु वैजिनाथ तेलंग (रा कळंब जि उस्मानाबाद) रिक्षा क्र. (एम एच-२३/एक्स-१४७९) या चौघांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे सहाय्यक पोलीस फौजदार राम यादव आणि पोलीस नाईक श्रीकांत चौधरी हे तपास करीत आहेत.

—–

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!