• Sun. Jun 21st, 2026

सभागृहातला अपमान सहन करणार नाही; निलंबनाच्या कारवाईनंतर रजनीताई पाटील यांची प्रतिक्रिया

Bybaba maske

Feb 11, 2023

सभागृहातला अपमान सहन करणार नाही; निलंबनाच्या कारवाईनंतर रजनीताई पाटील  यांची प्रतिक्रिया

रोखठोक न्युज वार्ताहर 

पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ चित्रित केल्याप्रकरणी काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार रजनी पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे सभागृहातून उर्वरित अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. आपण स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातून आलो आहोत. सभागृहातला हा अपमान सहन करणार नाही, उर्वरित अधिवेशन काय, पूर्ण टर्म निलंबित करा हवं तर अशी प्रतिक्रिया रजनी पाटील यांनी या कारवाईनंतर दिली आहे.

काँग्रसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी निलंबित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ त्या चित्रित करत होत्या. त्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पाटील व्हिडीओ चित्रित करत असल्याच्या कृतीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आपण सभागृहातला हा अपमान सहन करणार नाही, उर्वरित अधिवेशन काय, पूर्ण टर्म निलंबित करा हवं तर अशी प्रतिक्रिया रजनी पाटील यांनी या कारवाईनंतर दिली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!