• Sun. Apr 19th, 2026

जुनी पेन्शन लागू करण्या साठी उपजिल्हा रूगणालयातील कर्मचारी संपावर 

Bybaba maske

Mar 14, 2023

जुनी पेन्शन लागू करण्या साठी उपजिल्हा रूगणालयातील कर्मचारी संपावर 

 

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज उपजिल्हा रुग्णालय येथील समस्त कर्मचारी यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे की, सरकारी, निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर महानगरपालि नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत व अंशकालीन । कंत्राटी रोजंदारी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र यांनी NPS रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसह इतर प्रलंबित मागण्या मिळविण्यासाठी दि. 14/03/2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. सदर बेमुदत संपात उपजिला रुग्णालय केज या आरोग्य संस्थेतील सर्व (गट क्र.4 व. 3) संपात कर्मचारी सहभागी झाले असून जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पंर्यत आम्ही माघे हटणार नाही असी भुमीका सर्व कर्मचारीवर्गाने घेतली आहे.

चौकट

संपात कर्मचारीवर्ग जर ऐवढ्या मोठ्या प्रमाणात सामील झाला आहे तर पर्यायी व्यवस्था काय केली? असा प्रश्न उपस्थित केला असता. उपजिल्हा रुग्णालय केज चे वैद्यकीय अधीक्षक यांनी सांगीतले की सद्या एन आर एच एम मधील कर्मचारीवर्ग व डाॅक्टर ची मदत घेत आहोत तसेच चतुर्थ श्रेणी ती कर्मचारीवर्गाचे काम करण्या साठी दोन कंत्राटी माणसांची निवड केली आहे.तसेच लोखंडीसावरगाव येथील नर्सिग काॅलेज चे विद्यार्थीची मदत मागीतली आहे.:डाॅ संजय राऊत वैद्यकीय अधीक्षक केज.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!