पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या पाच वाहनातून इंधन चोरी. चोरटे एका हॉटेलच्या सीसी टीव्हीत कैद तर पेट्रोल पंपावरचे सीसी टीव्ही कॅमेरे मागील काही दिवसां पासून बंद !
पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या पाच वाहनातून इंधन चोरी. चोरटे एका हॉटेलच्या सीसी टीव्हीत कैद तर पेट्रोल पंपावरचे सीसी टीव्ही कॅमेरे मागील काही दिवसां पासून बंद !
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- केज बीड रोडवरील मस्साजोग येथील एका पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या पाच ट्रक मधील दिझेलची चोरी झाली असून पेट्रोल पंपा समोर असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, दि. ३ मार्च रोजी मध्यरात्री केज बीड रोडवरील मस्साजोग येथील देशमुख यांच्या स्वराज पेट्रोल पंपावर सतीश जाधवर (एम एच-४४/यु-१३३), रामहरी चौरे (एम एच-४४/यु-१२८३), तुकाराम कदम (एम एच-२३/ए यु-२०२५) आणि इतर दोन मालवाहू ट्रक व कंटेंर्स हे रात्रीच्या वेळी पंपाच्या परिसरात चालक त्यांच्या ताब्यातील वाहने उभी करून आराम करीत होते.
रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन दोन काळे कपडे घातलेले तरुण यांनी पाईपच्या साहाय्याने आतील इंधन काढले. ही सर्व घटना पेट्रोल पंपा समोरील शिवनेरी हॉटेल समोरील लावलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
चौकट :-
पेट्रोल पंपांचे सीसीटीव्ही कॅमरे बंद :- पेट्रोल पंपाच्या सुरक्षेसाठी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे काही महिन्या पासून बंद असल्याची माहिती मिळते आहे.