• Fri. Apr 24th, 2026

*दहा हजारांची लाच मागणारा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात*

Bybaba maske

Mar 20, 2023

दहा हजारांची लाच मागणारा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

रोखठोक न्युज वार्ताहर 

वडिलांचे नावे असलेल्या शेतामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूर जलसिंचन विहीरीच्या अंतिम देयकाचा 98 हजार 400 रुपयांचा धनादेश देण्यासाठी गावंदरा (ता. धारूर) येथील ग्रामसेवक राजाभाऊ मधुकर मुंडे (रा. कोठारबन, ता. वडवणी) याने मुलाकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती 10 हजार स्विकारण्याचे ग्रामसेवकाने मान्य केले. याबबत मुलाने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मात्र, त्यानंतर तक्रारदाराने पुढील कारवाई करण्यास असमर्थता दर्शविल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी फिर्यादी होवून तक्रार दिली. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा ग्रामसेवक राजाभाऊ मुंडे याच्यावर दाखल करण्यात आला

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!