केज तालुक्यातील दुर्दैवी घटना अंघोळ करण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडवून मृत्यू
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) येथे दुर्दैवी घटना घडली असून गावातील तीन अल्पवयीन मुले शेतातील पाण्याच्या खड्ड्यात बुडून मृत्युमुखी पडले.
या बाबतची माहिती अशी की, दि. २१ मार्च रोजी केज पासून १५ कि मी अंतरावर असलेल्या पैठण (सावळेश्वर) येथे चि. स्वराज जयराम चौधरी वय (७ वर्ष), चि. पार्थ श्रीराम चौधरी(८ वर्ष), चि. श्लोक गणेश चौधरी ही तीन मुले गणेश चौधरी वय (७ वर्ष) यांच्या शेतातील बोअर शेजारी असंलेल्या पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्ड्यात आंघोळी साठी गेली असता त्या पाण्यात बुडवून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे आणि त्यांचे सहकारी हे घटनास्थळी हजर झाले त्यानी प्रेत पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी युसुफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले आहे