शेतात पाळी घालताना विजेचा खांब तुटून तार तुटून दोन बैलांचा मृत्यू तर शेतकरी जखमी
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- शेतात पाळी घालणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर शेतातील विजेचा खांब तुटून वीज वाहक तारा शेतकरी व बैलांच्या अंगावर पडल्याने दोन बैल जागीच ठार तर पाळी घालणारा शेतकरी जखमी झाला आहे.
या बाबतची।माहिती अशी की, केज तालुक्यातील तुकुची वाडी येथे दि. २१ मार्च रोजी दुपारी २:०० दरम्यान पांढरीचे शेत नावाने ओळखल्या जात असलेल्या सर्व्हे नंबर २९१ मधील शेतात रामराव विठ्ठल मोराळे हे शेतात पाळी घालीत असताना शेतातील खांब तुटून त्याच्यावर लावलेली वीज वाहक तार ही शेतकरी व बैलाच्या अंगावर पडली. त्यात दोन्ही बैल जागीच मृत्यू पावले तर शेतकरी रामराव विठ्ठल मोराळे हे जखमी झाले आहेत. जखमी शेतकरी रामराव मोराळे त्यांच्यावर धारूर येथे उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती जखमी रामराव मोराळे यांचा मुलगा अशोक मोराळे यांनी केज पोलीस ठाण्यात दिल्या वरून या अपघाताची नोंद केज पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.