• Fri. Apr 24th, 2026

हॉटेल मालक आणि कामगारांवर सहा जणांचा हल्ला : दोघे गंभीर जखमी  

Bybaba maske

Mar 22, 2023

 हॉटेल मालक आणि कामगारांवर सहा जणांचा हल्ला : दोघे गंभीर जखमी

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- केज येथे केज बीड रोड वरील हॉटेलवर सहा जणांनी हॉटेल मालक आणि कामगारांवर हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २१ मार्च रोजी रात्री १०:३० वा. च्या सुमारास केज-बीड रोडवरील हॉटेल यशवंत ढाबा येथे पापा फारोखी, आवडया शेख, प्रकाश गालफाडे, संतोष चौरे आणि इतर दोन अनोळखी ईसमानी हल्ला करून हॉटेल मालक

रामचंद्र बाबासाहेब घुले आणि हॉटेल मधील कामगार विकास सुग्रीव सांगळे यास लोखंडी रोड आणि शस्त्राने हल्ला केला. त्यांच्या या हल्ल्यात हॉटेल कामगार विकास सांगळे याच्या डोक्यात गंभीर जखमी झाली असून रक्तस्त्राव झाला आहे तर हॉटेल मालक रामचंद्र घुले याच्या डाव्या कानावर गंभीर जखमी झाली आहे.

जखमींना औषधोपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. सहाययक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!