श्री संस्कार सुपर अबॅकस अकादमीच्या पाच दिवसीय कार्यशाळेचा समारोप समारंभ संपन्न

रोखठोक न्युज
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार सुपर अबॅकस अकॅडमी अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय मोफत कार्यशाळेचा समारोप पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बुधवारी सकाळी मोठ्या थाटात संपन्न झाला.
याविषयी सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील चिंचोली माळी सारख्या ग्रामीण भागात उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे व गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी संचालक अनिल गलांडे यांनी श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन श्री संस्कार प्री इंग्लिश स्कूल बरोबरच श्री संस्कार सुपर अबॅकस अकॅडमी ची स्थापना केली व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अबॅकस सारख्या शिक्षण प्रणालीची आवड निर्माण व्हावी यासाठी पाच दिवसीय मोफत अबॅकस कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेचा समारोप समारंभ चिंचोली माळी चे माजी सरपंच सुनील बापू देशमुख ह. भ. प. सुनील आबा मेहकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करून समारोप करण्यात. आला यावेळी प्रस्ताविक पर बोलताना संचालक अनिल गलांडे यांनी जीवनात शिक्षणाचे महत्त्व सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अबॅकस सारखे प्रणाली संगणक शिक्षण अवगत करुन गरुड झेप घ्यावी असे आवाहन केले व जास्तीत जास्त संख्येने प्रवेश निश्चित करावे त असे आवाहन केले. तर ह.भ.प. आबा महाराज मेहरकर यांनी शिक्षणातील नवनवीन आवाहने स्विकारले पाहीजेत व तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असा मोलाचा सल्ला दिला.
या कार्यक्रमासाठी भगवान राऊत, पिनु नखाते, अजित गलांडे, लक्ष्मण काळे, संतोष वाघमारे, प्रकाश गलांडे, महादेव गायकवाड, दादा निंगुळे, वर्षा घोडके, पुनम वनवे, उर्मिला गीते, सुप्रिया सारुक, यांच्यासह गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

