• Fri. Apr 24th, 2026

केजमध्ये दोन गटात वाद 70 जन ताब्यात. अफवांवर विश्वास ठेवू नका- एसपी ठाकूर सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर

Bybaba maske

Mar 24, 2023

केजमध्ये दोन गटात वाद 70 जन ताब्यात. अफवांवर विश्वास ठेवू नका- एसपी ठाकूर सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर

रोखठोक न्युज वार्ताहर 

. 23 मार्च गुरुवार रोजी रात्री 11.30 वा. च्या दरम्यान केज शहरातील लोंढे गल्ली परिसरामध्ये दोन गटांमध्ये तेढ निर्माण होऊन दोन गट समोरासमोर आल्याने हाणामारी झाली, त्यामध्ये अफवा पसरल्यामुळे दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करून हल्ला केला. घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेमध्ये कोणीही फिर्याद देत नसल्यामुळे या घटनेच्या प्राप्त माहितीवरून पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन नमूद प्रकरणामध्ये गुन्हा नोंद केला आहे. सदर गून्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्या फिर्यादीवरून फिर्याद दाखल करून दोन्ही गटातील 70 इसमांना ताब्यात घेतले आहे. तसेच इतर 50 ते 60 लोकांवर भादवि कलम 143,147,148,149,153(अ)323,324,295,336,308,427,160,188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये असल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवून परिसरात सध्या शांतता आहे. सतर्क बंदोबस्त नेमण्यात आलेला असून, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. सोशल मीडिया, व्हाट्सअप फेसबुक, यावरही पोलीस यंत्रणेचे कटाक्षाने करडी नजर आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवण्याचे काम नागरिकांनी करू नये. तसेच कोणत्याही घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारे नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, जेणेकरून समाजामध्ये शांतता प्रस्थापित राहील. असे आवाहन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूट यांनी नागरिकांना केले आहे.

पोलीस अधीक्षक ठाकूर हे स्वतः केज शहरात तळ ठोकून आहेत. तसेच अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सतीश वाघ, आणि इतर 15 अधिकारी व 150 कर्मचारी केज शहरामध्ये बंदोबस्तात तैनाद असून, पोलीस प्रशासन सतर्क आहे. कोणीही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!