• Sat. Oct 31st, 2026

चिंचोली माळी येथे अवैध दारू विक्री जोमात ! दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी गावकऱ्यांची मागवी

Bybaba maske

Mar 25, 2023

चिंचोली माळी येथे अवैध दारू विक्री जोमात ! दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी गावकऱ्यांची मागवी

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे सर्रास अवैध दारू जोरदारपणे सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादामुळे चिंचोली माळी येथे अवैध दारू विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत. दरम्यान पोलिस प्रशासनाने चिंचोली माळी येथील दारू विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.चिंचोली माळी भाजीमंडईत सर्वसामान्याना जाणे आता अडचणीचे होत आहे. या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत खुलेआम अवैध देशी दारुची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेष म्हणजे चिंचोली माळी गाव हे पोलिस ठाण्यापासून अवघ्या ९ किलोमटर अंतरावर आहे तरी हे धंदे राजरोस सुरू असून, केज पोलिस प्रशासन पथकाचे याकडे सर्रास दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे.चिंचोली माळी नागबेट व गावातील चौकात मोकळी जागा आहे. ही जागा अवैध धंदे करणाऱ्यासाठी नंदनवन ठरत आहे. विशेष म्हणजे चिंचोली माळी सध्या नागबेट वस्ती या ठिकाणी अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैधरित्या थाटलेल्या या दुकानाच्या आसपास तळीरामांची गर्दी दिसून येते. या तळीरामाच्या त्रासाला अनेक महिलांना सामोरे जावे लागते. तात्पुरता आडोसा तयार करून या ठिकाणी हे अड्डे सुरू करण्यात आले आहेत. वाईनशॉपपेक्षा पाच ते दहा रुपये जास्त दर आकारून ही देशी दारू विकण्यात येते. ग्राहकांसाठी येथे अड्डाचालका पाणी पाऊच, ग्लास तसेच चखण्याची देखील व्यवस्था असल्याने हे अड्डे चांगलेच चालत आहेत. येथील व्यापारी वर्ग, तसेच खरेदीसाठी येणारे ग्राहक यासर्व बाबींनी त्रस्त झाले आहेत, मात्र केज पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई या विक्रेत्यावर होत नाही तरी केज पोलीस ठाण्या कडुन अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी व गाव‌ दारु मुक्त करण्यात यावे अशी मागणी समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

.

baba maske

Related Post

केज पोलिसांची सतर्कता! हरवलेले ११ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत; नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
दिवाळीच्या तोंडावर अतिक्रमणधारकांवर प्रशासनाचा हातोडा! दुष्काळात छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ?अंबाजोगाईत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शासकीय रुग्णालयापर्यंत दोन्ही बाजूंनी ५०-५० फुटांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम; वर्षभरात दुसऱ्यांदा कारवाई, नागरिकांत संताप!
ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार धडकली, अंबाजोगाईचे दोघे जखमी ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार धडकली, अंबाजोगाईचे दोघे जखमी केज तालुक्यातील कुंबेफळ शिवारातील अपघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!