• Fri. Apr 24th, 2026

कोरेगाव येथील बलात्कार घटनेतील आरोपी पोलीसांच्या ताब्यात

Bybaba maske

Mar 25, 2023

कोरेगाव येथील बलात्कार घटनेतील आरोपी पोलीसांच्या ताब्यात

रोखठोक न्युज 

कोरेगाव येथील बलात्कार घटनेतील आरोपी पोलीसांच्या ताब्यात

गौतम बचुटे/केज :- अल्पवयीन मुलीवर जवळच्या नातेवाईकाने बलात्कार केल्याच्या तणावातून पीडितेच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या घटनेतील आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

केज तालुक्यातील एका आदिवासी समाजाच्या वस्तीवर बहिणीला भेटायच्या बहाण्याने येत असलेल्या सुनेच्या भावाने त्याच्या बहिणीच्या अल्पवयीन नणंदेवर घरात कोणी नसल्याची संधी साधून लैंगिक अत्याचार केला होता. ही घटना अल्पवयीन आईला समजताच तिने समाजातील बदनामीमुळे दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:०० वा च्या दरम्यान वस्तीवरील पत्र्याच्या शेड मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गु. र. नं. ८६/२०२३ भा. दं. वि. ३७६, ४५२, ३०६, ५०७, ३४ यासह बाळ लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ कलम ६ आणि ८ नुसार गणेश काळे याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आरोपी पोलीसांना सापडत नव्हता.

दरम्यान दि. २५ मार्च रोजी सदर आरोपी येळंब येथे आला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच केज पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार आणि तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, दिलीप गित्ते, अनिल मंदे आणि शिवाजी कागदे यांनी तो बेसावध असताना ताब्यात घेतले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!