• Sat. Oct 31st, 2026

लाडेवडगाव येथे लाईनमनला मारहाण ; एकावर गुन्हा दाखल  

Bybaba maske

Mar 25, 2023

लाडेवडगाव येथे लाईनमनला मारहाण ; एकावर गुन्हा दाखल

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- कागदपत्रे व कोटेशनसाठी पैसे देत लगेच कनेक्शन जोडून दे म्हणत एकाने लाईनमनला शिवीगाळ करीत प्लास्टिक पाईपने मारहाण केल्याची घटना लाडेवडगाव ता. केज येथे शुक्रवारी दि.२४ मार्च दुपारी घडली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

केज तालुक्यातील होळ येथील विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयात लाईनमन पदावर ज्ञानेश्वर लक्ष्मण गडदे ( वय ३० वर्ष) रा. चिचखंडी ता. अंबाजोगाई हे सप्टेंबर २०२० पासून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे लाडेवडगाव हे गाव असून २४ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता वीज बिलाच्या वसुलीसाठी या गावातील विलास मस्के यांच्या घरा जवळील लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. त्यांच्याकडे गावातील हनुमंत रघुनाथ शेप, प्रभाकर किसनराव केंद्रे हे दोघे आले. त्यावेळी लाईनमन ज्ञानेश्वर गडदे यांनी प्रभाकर केंद्रे यांना थकीत बिल भरण्या बाबत विचारणा केली असता; त्यांनी ५ हजार रुपये भरणा करतो म्हणाले. तेव्हा तुमच्याकडे ११ हजार रुपये थकबाकी आणि वस्तीवरील नागरिकांकडे थकबाकी असल्या वरून वस्तीचा विद्युत पुरवठा खंडित केल्याचे सांगून त्यांना वरिष्ठांशी बोलण्यास सांगितले. तेवढ्यात हनुमंत शेप याने नवीन लाईट कनेक्शन घ्यायचे असे सांगून त्यासाठी आधार कार्ड, सात बारा व ३ हजार रुपये लाईनमनकडे देऊन आताच कनेक्शन जोडुन द्या; असे म्हणाला. त्यावरून सर्वांचे थकीत बील भरल्यास आणि वरिष्ठांच्या आदेशा प्रमाणे कनेक्शन जोडण्यात येईल; आता कोणाचेही कनेक्शन मला जोडता येत नाही. असे लाईनमन गडदे यांनी सांगून त्यांचे पैसे व कागदपत्रे परत केली. त्या नंतर चिडलेल्या हनुमंत शेप याने शिवीगाळ करीत प्लास्टिक पाईपने मारहाण केली. याची माहिती अभियंता अजय पांडे यांना देऊन नंतर लाईनमन ज्ञानेश्वर गडदे यांनी पोलिसात तक्रार दिली. त्या वरून हनुमंत शेप याच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गु. र. नं. ६३/२०२३ भा. दं. वि. ३५३, ३३२, ३२३, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास तुपारे हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Related Post

केज पोलिसांची सतर्कता! हरवलेले ११ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत; नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
दिवाळीच्या तोंडावर अतिक्रमणधारकांवर प्रशासनाचा हातोडा! दुष्काळात छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ?अंबाजोगाईत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शासकीय रुग्णालयापर्यंत दोन्ही बाजूंनी ५०-५० फुटांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम; वर्षभरात दुसऱ्यांदा कारवाई, नागरिकांत संताप!
ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार धडकली, अंबाजोगाईचे दोघे जखमी ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार धडकली, अंबाजोगाईचे दोघे जखमी केज तालुक्यातील कुंबेफळ शिवारातील अपघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!