केज तालुक्यातील कौडगाव येथील सरपंचाने ग्रामपंचायत कार्यालयात गावतील लोकांन समोर रोजगार सेवकास आई बहिणी वरून शिव्यांची लाखोळी वाहिल्याची व्हिडीओ किल्प सद्या वायरल झाली आहे.काही दिवसा पूर्वी ग्रामपंचायत च्या निवडणूक झाली व सत्तांतर झाले.त्या नंतर त्या ग्रामपंचायतच्या सरपंचाला जुने कर्मचारी खटकू लागले.आपल्या मर्जीतील कर्मचारी असावे असे वाटू लागले आणि त्यातच खटके उडू लागले.त्याच कारणाणे ग्रामपंचायत मध्ये सरपंच व रोजगार सेवकात गरमागरमी झाली व त्याचे पुनर्वसन शिविगाळीत व अंगावर धावून येण्या इतपत झाली व ग्रामपंचायत राडा झाला.पण महाराष्ट्रा शासनाकडून दिलेल्या नियमावलीत नवीन सरपंचास रोजगार सेवकास काढून टाकण्याचा काहीच आधिकार नाही तो आधिकार ग्रामसभेला दिले गेले आहेत.तरी सुद्धा एखादा सरपंच रोजगार सेवकास शिविगाळ करत असेल तर पंचायत समितीचे गटविकास आधिकारी काय भुमिका घेतात ते बघावे लागेल?
नियुक्ती प्राधिकारी
अ) ग्राम रोजगार सेवकांच्या सेवा उपलब्धते संदर्भात ग्राम सभा (ग्रामपंचायत नव्हे) निर्णय घेईल.
ब) त्याला काढून टाकण्याच्या संदर्भात ग्रामपंचायत किंवा सरपंच यांना निर्णय घेण्याचा अधिकार नसून केवळ ग्रामसभेस त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असेल.
क) ग्रामपंचायतीचे पदाधिकारी बदलले तरी ग्राम रोजगार सेवक बदलू नये.
ड) सबळ कारणावरून ग्राम रोजगार सेवकाला काढून टाकण्यापूर्वी त्याला नैसर्गिक न्यायानुसार ग्रामसभेत त्याचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी आणि त्याबाबत ग्राम सेवकाचे अभिप्राय घ्यावेत.
इ) गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) किंवा तत्सम अधिकारी यांनी त्यांना नियुक्तीचे आदेश देऊ नयेत.