केज येथे हॉटेल मालक आणि कामगारांवर हल्ला प्रकरणी तिघांना पोलिसांनीघेतले ताब्यात
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज :- केज येथे केज-बीड रोड वरील हॉटेलवर सहाजणांनी हॉटेल मालक आणि कामगारांवर लोखंडी रोड व चाकूने हल्ला गल्ल्यातील २२ हजार रु. चोरून नेले होते. त्या प्रकरणातील सहा आरोपी पैकी पोलिसांनी तीन आरोपी ताब्यात घेतले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, दि. २१ मार्च रोजी रात्री १०:३० वा. च्या सुमारास केज-बीड रोडवरील हॉटेल यशवंत ढाबा येथे पापा उर्फ ख्वाजा मुस्तफा फारोकी, आवेज उर्फ आवडया ख्वाजा शेख, प्रकाश गालफाडे, संतोष चौरे आणि इतर दोन अनोळखी ईसमानी हल्ला करून हॉटेल मालक
रामचंद्र बाबासाहेब घुले आणि हॉटेल मधील कामगार विकास सुग्रीव सांगळे यास लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला करून हॉटेलची नासधूस करून गल्ल्यातील २२ हजार रु. चोरून नेले होते. या हल्ल्यात हॉटेल कामगार विकास सांगळे याच्या डोक्यात मार गंभीर जखमी होता. तर हॉटेल मालक रामचंद्र घुले यांच्या कानाला दुखापत झाली होती.
या प्रकरणी हॉटेल मालक रामचंद्र बाबासाहेब घुले यांच्या फिर्यादी वरून पापा उर्फ ख्वाजा मुस्तफा फारोकी, आवेज उर्फ आवडया ख्वाजा शेख, प्रकाश गालफाडे, संतोष चौरे आणि इतर दोन अनोळखी इसम यांच्या विरुद्ध दि. २२ मार्च रोजी गु. र. नं. १७०/२०२३ भा. दं. वि. १४३, १४७, १४८, ३०७, ४२७, ४५२, ५०४, ५०६ नुसार दाखल करण्यात आला होता.
त्या प्रकरणी तपासी अधिकारी तथा प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि दिलीप गित्ते यांनी पापा उर्फ ख्वाजा मुस्तफा फारोकी, प्रकाश गालफाडे, संतोष चौरे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील इतर आरोपीची लवकरच ताब्यात घेतले जाणार आहेत.