• Sat. Apr 18th, 2026

मौजे लव्हुरी येथील सिमेंट रस्त्याचे निकृष्ट काम गुत्तेदार अर्धवट सोडून पळाला

Bybaba maske

Apr 10, 2023

मौजे लव्हुरी येथील सिमेंट रस्त्याचे निकृष्ट काम गुत्तेदार अर्धवट सोडून पळाला

 

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील मौजे लव्हुरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचे काम सुरू आहे आणि ते काम अगदी निकृष्ट दर्जाचे सुरू होते म्हणून येथील गावकऱ्यांनी सदरील कामाचे इस्टीमेट (अंदाजपत्रक) सदरील काम करणाऱ्या एजन्सीला मागीतले असता गुत्तेदार घाशा गुंडाळून पळाल्याची घटना घडली आहे. यामुळे सदरील एजन्सी ला शासनाच्या काळ्या यादीत टाकावे अशी सुध्दा नागरिकांतुन चर्चा आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील मौजे लव्हूरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत सिमेंट रस्त्याचे काम चालु आहे सरील काम करणाऱ्या एजन्सीने हे काम निकृष्ट दर्जाचे चालू केलेले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी अंदाजपत्रकाची मागणी श्री. कोळगे साहेब उपअभियंता सा.बां. विभाग अंबाजोगाई यांच्याकडे केली परंतू त्यांनी व एजन्सीने सदरील काम जाणीवपूर्वक निकृष्ठ दर्जाचे चालूच ठेवले त्यामुळे ग्रामस्थांनी काम बंद केले त्यानंतर सदरील एजन्सीने काम अंदाजपत्रकानुसार चालू न करताच कामावरील सामान घेवून जावून काम बंद केले आहे. त्यामुळे सदरील ठिकाणाहून ये – जा करण्यासाठी त्रास होत आहे. व एस. टी. बंद असल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नूकसान व 25 गावातील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नुकसान होत आहे. सदरील रस्ता खोदून ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होवू शकतात व जिवीतहानी होवू शकते. त्यामुळे सदरील अर्धवट कामाची उच्चस्तरीय चौकशी होवून एजन्सीवर गुन्हे दाखल करावेत व संबंधित एजन्सीची कसलेही देयक अदा करण्यात येवू नये अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांच्या कडे केली आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष कैलास चाळक, वैभव चाळक, कृष्णा जगताप यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

चौकट 

सदरील कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा:- कैलास चाळक

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!