• Sun. Apr 19th, 2026

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचा लिपीक ३७ हजारांची लाच स्वीकारताना सापडला

Bybaba maske

Apr 10, 2023

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचा लिपीक ३७ हजारांची लाच स्वीकारताना सापडला

रोखठोक न्युज वार्ताहर 

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता कार्यालयातील एक कर्मचारी (लिपीक) ३७ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडला असल्याची माहिती समोर आली आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आस्थापना विभागात काम करणारा कर्मचारी अशोक नाईकवाडे यास ३७ हजार रुपयांची लाच स्विकारताना बीड येथील लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावरील हॉटेल आशियाना येथे रंगेहाथ पकडले असल्याची मिहिती मिळते आहे. सदरील घटनेला अधिष्ठाता कार्यालयातुन दुजोरा मिळाला असून अशोक नाईकवाडे यास लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळते आहे.

या संदर्भात लाचलुचपत विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार अधिष्ठाता कार्यालयातील लिपीक अशोक अच्चुतराव नाईकवाडे वय ४२, कनिष्ठ लिपीक याने तक्रार दार यास त्यांचे मयत सासरे यांच्या जागेवर त्यांचे पत्नीस अनुकंपा धर्तीवर नौकरी लावतो म्हणून ८० हजार रुपयांची मागणी केली होती. अंतर ३७ हजार रुपयांवर तोडफोड होवून १० एप्रिल २३ रोजी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरील आशियाना हॉटेल येथे ३७ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले.

सदरील कार्यवाही लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल धस यांनी केली. यावेळी सापळा पथकात पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हेत्रे यांचा समावेश होता.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!