• Mon. Jun 22nd, 2026

केज तालुक्याचे भुमीपुत्र किशोर दळवे यांची कास्यपदकाला गवसणी.

Bybaba maske

Apr 11, 2023

केज तालुक्याचे भुमीपुत्र किशोर दळवे यांची कास्यपदकाला गवसणी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील चिंचोली माळी चे भूमिपुत्र प्रा.श्री किशोर बाबुराव दळवे यांनी दि.९-४-२०२३ रोजी शिर्डी येथे झालेल्या आठव्या नॅशनल रायफल व पिस्टल/स्लिंगशॉट चॅम्पियनशिप -२०२३ सदरील नॅशनल पातळीवरील स्पर्धेत पिस्टल या प्रकारात ओपन वयोगटातील प्रवर्गातून अतिशय अटीतटीच्या या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून कास्यपदकाला गवसणी घातली आहे.

सदरील स्पर्धेचे आयोजन एअर गन असोसिएशन ऑफ इंडियन व स्लिंगशॉट असोसिएशन ऑफ इंडियन यांच्यामार्फत केले होते.

 प्रा.श्री किशोर दळवे यांच्या या यशाबद्दल दगडू दळवे, बाबुराव दळवे, महादेव दळवे, आशा दळवे, दया दळवे,प्रा.श्री अशोक कोरडे यांनी अभिनंदन केले यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!