• Sun. Apr 19th, 2026

 मोटार सायकलच्या अपघातात तरुण गंभीर जखमी  

Bybaba maske

Jun 21, 2023

 मोटार सायकलच्या अपघातात तरुण गंभीर जखमी

गौतम बचुटे/केज 

केज- कळंब रोडवर साळेगांव येथे झालेल्या मोटार सायकलच्या अपघातात दुचाकीच्या कुशन कव्हर विक्रेता गंभीर जखमी झाला आहे.

दि . २० जून रोजी रात्री ८:३० वा. सुमारास अक्षय दादाराव जोगदंड वय २५ वर्ष रा साळेगांव ता. केज याच्या मोटार सायकलचा साळेगांव येथील केज.कळंब रोडवरील सलीम शेख यांच्या शेतकरी अमृत तुल्य चहाच्या हॉटेल जवळ अपघात झाला. या अपघातात चिंचोली पाटी जवळ महामार्गावर दुचाकी व इतर वाहनांचे सीट कव्हर विक्रीचा व्यवसाय करीत असलेला अक्षय जोगदंड याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. अपघात झाल्या नंतर रवि बचुटे व कैलास पटणे यांनी जखमी अक्षय जोगदंड याला खाजगी वाहनाने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. उपजिल्हा रुग्णालयातील कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. राऊत, त्यांचे सहकारी व स्टाफ यांनी जखमींवर प्रथमोपचार करून पुढील संदर्भीय उपचारासाठी इतर ठिकाणी हलविले आहे.

दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला? हे स्पष्ट झालेले नाही.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!