• Sun. Apr 19th, 2026

स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्या साठी धडपडणारे राजकीय नेते,केजच्या छोट्या व्यावसायिकांचे पुनर्वसन करतील का?  

Bybaba maske

Jun 21, 2023

स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्या साठी धडपडणारे राजकीय नेते,केजच्या छोट्या व्यावसायिकांचे पुनर्वसन करतील का?

रोखठोक न्युज वार्ताहर 

आपले स्वतःचे,आपल्या मुलाचे,राजकीय पुनर्वसनासाठी धडपडणारे व राजकीय पुनर्वसन करणारे नेते मंडळी या गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या व्यवसायिकांचे पुनर्वसन करतील का?

एका नगरपंचायत च्या ठरावाने केज शहरातील उपजीविका भागवणार्याच होत्याच नव्हत झाल.त्यांच पुनर्वसन होणे गरजेच झाल आहे.केज शहरातील सर्व विभागातील विभाग प्रमुखानी अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला. तहसील , पंचायत समिती , कृषी , पोलिस प्रशासन सर्वानी आपल्या परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी सर्व मोहिमेत आघाडी घेतली यामधे तहसील कार्यालय परिसरातील सर्व अतिक्रमण काढले तसेच कंपाऊडला चिटकून असलेले पण काढले परंतु शहरभर ज्याची चर्चा झाली त्याचे मात्र काढता आले नाही , यामुळे याच साठी केला होता अट्टाहास अशी शहरभर चर्चा सुरु आहे . तसेच पंचायत समिती तालुका आरोग्य कार्यालय , पशु वैद्यकीय विभाग , तहसीलचे जुने गोदाम , कृषी विभाग , कळंब रोड , जिल्हा परिषद शाळा , उमरी रोड या भागातील अतिक्रमण काही काढले काही राहीले त्यामुळे जे राहीले त्यांनी प्रशासनाचा नाकावर टिच्चून आपले बस्तान बसवले , यामुळे सामान्य व्यावसायिक वर्गात प्रशासनाच्या विरोधात तिरस्काराची भावना निर्माण झाली आहे.

नगर पंचायत व सर्व विभागाने आपली व्यावसायिक अडवणूक केली अशीच भावना निर्माण झाली आहे तर काहीना अतिक्रमणाच्या जागेवर अव्वाच्या सव्वा भाडे घेणाराचे बस्तान उठवल्याच्या आनंद आहे.

सर्व सामान्य व्यावसायिकाची अडवणूक करणाऱ्या जागाभाडे घेणारामुळे अनेकांचै जीव मेटाकुटीला आले होते. रस्त्यावर फळाचे गाडे , भेळ , पाणीपुरी , आईस्क्रीम , भाजीपाला विकणाराकडूनही भरमसाठ भाडे आकारले जात होते त्यामुळे किराया माफीया विरोधात सामान्य व्यावसायिकात रोष होताच त्यामुळे पण अनेकांना आनंद होत आहे.

काही जणांना माझ तुटल त्याच कस काय वाचल याची जास्त चिंता वाटत आहे तर काही जणांचे राहिलेच कसे त्यांच्या कडे सातबारा , पिटीआर , बांधकाम परवाना दिलाच कसा अशी विचारणा पण होत आहे.

परंतु काहीही असल तरी सरकारी इमारती मात्र स्वच्छ दिसायला लागल्या हे मात्र तितकेच खरे , पत्र्याच्या शेडमुळे बाजारपेठ नसल्यातच जमा होती परंतु केज शहरात जेमतेम जी बाजारपेठ होती ती फक्त एवढिच होती हे पण निश्चित .

अतिक्रमण उठवले खरे पण कसे उठवले हे सर्वसामान्य लोकांना समजायला मार्ग नाही आता सामान्य व्यावसायिकाचे काय होणार हे मात्र कळायला मार्ग नाही अस साधारणतः

————————————————-

आता नगर पंचायत , जिल्हा परिषद व तहसील प्रशासनाने गाळे काढून व्यावसायिकाना द्यावेत अशी मागणी होत आहे.

प्रशासनाने अतिक्रमण काढल्यामुळे हजारो लोकाचा रोजगार गेला आहे , जे व्यावसायिक होते त्यांच्या कडे काम करणारे देखील बेरोजगार झाले आहेत अश्या हजारोचा उदरनिर्वाह कसा चालावा याबाबतीत विचार होणे आवश्यक आहे . अतिक्रमण उठवण्याबाबतीत कोणाचही म्हणन काहीच नाही परंतु प्रत्येकाच्या हाताला काम पाहिजे यासाठी नगर पंचायत कडून त्यांच्या जागेत व्यापारी संकुल काढणे आवश्यक आहे . २००६ साली जिल्हा परिषदेकडून व्यापारी संकुलाचा ठराव मंजूर झाला होता व त्याची निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन नगरच्या कंपनीला निविदा मंजूर झाली होती परंतु कुठे तरी माशी शिंकली अन व्यापारी संकुल लांबले याचा परिणाम पंचायत समिती पासुन कानडी रोड पर्यंत संकुल झाले आसते तर जवळजवळ ३०० – ४०० व्यावसायिक आपला व्यवसाय करु शकले असते व जिल्हा परिषदेला पण महसुल मिळाला असता.

तसेच कृषी विभागाची फलोत्पादन च्या जागेवर देखील व्यापारी संकुल झाले असते व त्या ठिकाणी पण सरकारला फलोत्पादन विभागाचे प्रयोग करायला रोपवाटीका असेल किंवा प्रक्रिया उद्योग आदी प्रकल्प राबवायला जागा आहे ती वापरून शहराच्या विकासाला गती मिळाली असती.

शहराला व्यापारी नसतील तर शहर उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही व्यवसाय हा शहराचा कणा असतो अन्यथा अराजकता माजेल हे लक्षात घ्यावे . सर्व राजकीय पुढाऱ्यांना विनंती आपले हेवेदावे स्वार्थ बाजुला ठेवून शहरातील छोटे व्यवसाय कसे उभारता येतील याचा विचार केला पाहिजे अन्यथा शहर बकाल व्हायला वेळ लागणार नाही हे लक्षात घ्या .

आणी हि जबाबदारी प्रशासनाचीच आहे की आपल्या भागातील व्यावसायिक वर्गाची सुविधा पुरविणे व त्यांना आवश्यक त्या गरजाची पुर्णता करणे हि जबाबदारी प्रशासनाने लवकर पारपाडावी अन्यथा वैफल्यग्रस्त व्यावसायिक कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही ज्याची बुद्धी जशी चालेल तो त्या मार्गाला जाईल तेव्हा प्रशासनाने व लोकप्रतिनिधीनी याची नोंद घ्यायला हवी ..

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!