• Fri. Jun 5th, 2026

केज पंचायत समिती आवारात मटक्याचा सुळसुळाट!

Bybaba maske

Jun 25, 2023

केज पंचायत समिती आवारात मटक्याचा सुळसुळाट!

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज येथील पंचायत समितीच्या आवारात खुले आम मटका चालू आहे.केज येथील पंचायत समिती आवारात खुले आम सुरू आहे. एएसपी पंकज कुमावत यांच्या सारखे सिंघम पोलीस अधिकारी असताना केज येथे पोलीस स्टेशन समोर असलेल्या पंचायत समिती आवारात मटका घेणे खुले आम चालू तरी या मटक्याच्या धंद्यात कमिशन वर खेळ घेणार्‍या जुजबी कारवाई न होता मटक्याच्या बुकींच्या राजकीय वरदहस्त असणार्‍या मालकांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केज येथील पंचायत समिती मध्ये येणाऱ्या नागरिकांनी केली.केज तालुक्यायांसह मोठ्या गावात मटका खेळवण्यासाठी दहा ते पंधरा टक्केवारी ने खेळ घेणार्‍या एजंटचे जाळे विस्तारलेले आहे. पोलीस प्रशासन कारवाई करते मात्र हा अवैध व्यवसाय बंद होत नसल्याने सामान्य जनता मात्र या अवैध व्यवसायाने त्रस्त झाली आहे. राजकीय वरदहस्त असणार्‍या या मटक्याचे बुकी मालकांनी उधारीवर खेळलेल्या मटक्याच्या थकबाकी पोटी अनेक जणांना आपले घर, जागा लिहून द्यावी लागली असल्याचे पीडित सांगत असून या मटक्याचे व्यसनाचे दुष्परिणाम गावोगावी जाणवत आहेत.तालुक्यातील राजरोस पणे सुरू असलेल्या कल्याण मुंबई या मटक्याचे सुळसुळाट झाला असताना हे मटक्यावाले हायटेक सुविधा देण्यासाठी वेगळ्या पद्धतीने सुरू आहे .तरी पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!