नगराध्यक्षाच्या वार्डातच घाणीच साम्राज्य,बाकी वार्डात काय अवस्था असेल?
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरातील वार्ड क्रमांक 7 हा नगराध्यक्षाचा वार्ड आहे.हा वार्ड म्हणजे शहराचा आदर्श, भुषण असेल असा हवा असतो पण खोट्या आश्वासनाची खैरात जनतेला देऊन आलेले जनविकास परिवर्तन आघाडी चे नेत आज सत्तेत आल्यावर आश्वासन विसरून गेलेत.फक्त सोशल मीडियावर दिसणारा हा विकास प्रत्यक्षात कधो येईल याची गॅरेंटी कोणीच देऊ शकणार नाही. कचरा,नाली च्या टेंडर साठी लाखोंच टेंडर करणार हे सत्ताधारी जनतेला जनतेच्या पैशातून घेतलेल्या करातून वंचित ठेवत आहे. 100 कोटीच्या गप्पा मारणार जनविकास परिवर्तन आघाडीच नेतृत्व साध केजचा कचरा,नाली साफ करू शकत नाही.एक,सव्वा वर्षाच्या कालावधीत जनतेच्या नजरेत भरतील अस कुठलच काम या सत्ताधाऱ्यांकडून झाले नाही.एखादा पाच कोटीचा निधी आला तर त्याची दंवडी देण्या साठी लाखाचा खर्च करणार हे सत्ताधारी आमदारांनी आणलेला 76 कोटीचा निधीचे काय झाले हे काही सांगू शकत नाहीत.त्यातच गोरगरीब जनतेच्या अतिक्रमणाचा प्रश्न असंवेदनशील पद्धतीने सोडवून हातावर पोट असणाऱ्या टपरीधारकाना देशोधडीला लावले.केज चा विकास जर तुमच्या कडून होत नसेल तर राजीनामा द्यावा असे आता जनतेतून बोलले जात आहे.