विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती..!
:- महेश जगताप मुंबई प्रतिनीधी
औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी केलेला अर्ज शासनाने आज मंजूर केला आहे. धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या केंद्रेकर यांनी काही दिवसापुर्वी व्हीआरएस घेतला होता.
महसुल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी राज्य शासनाकडे गेल्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यानुसार त्यांचा अर्ज आज मंजूर करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात शेतकरी कुटुंबाचा सर्व्हे अंती त्यांनी दोन रब्बी व खरीप हंगामात प्रती शेतकरी १० हजार मदत शेतकऱ्यांना देण्याचं मत व्यक्त करत सर्व्हेचा अहवाल शासनाला सादर केला होता. यावरून सरकार व सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याचे बोलले जात होते. दरम्यान त्यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यांचे दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये ते औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त म्हणून रुजू झाले होते. शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण त्यांच्या नेतृ्वाखाली पूर्ण व्हावी यासाठी हायकोर्टाने देखील ३० जून २०२३ पर्यंत त्यांची बदली रोखली होती.
साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर सध्या विभागीय आयुक्त आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेतला होता. केंद्रेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची कृषी आयुक्त पुणे या पदावरून बदली झाली. नंतर क्रीडा विभागात बदली झाली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे परतले होते.
साधी राहणीमान कसलाही पदाचा बडेजाव नसनारा लोकांची अडचण ओळखणारा अधिकारी अधिक काळ जनसेवेत राहावा अचानक घेतलेला स्वेच्छा निवृतीचा निर्णय घेतल्याने नागरीक व प्रशासनात अश्चर्य व्यक्त होत आहे केद्रेकरांनी घेतलेल्या निर्णयामुळे जनतेतुन दुख: भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
व्यक्तिश: स्वेच्छा निवृत्ती- सुनिल केंद्रेकर
या संदर्भात आयुक्त सुनिल केंद्रेकर यांचेशी संपर्क साधला असता त्यानी व्यक्तिश: स्वेच्छा निवृत्ती घेतली आसल्याचे सांगीतले. शेतकरी सर्व्हे व मदतीबाबत प्रशासन व शासनाकडुन आपणावर दबाब/ त्रास दिला गेला ? या बद्दल विचारले असता मि त्रासाला किंवा दबावाला भिक घालनारा पैकी नाही असे सुनिल केंद्रकर यांनी दुरध्वनीवर बोलतांना सांगीतले.