• Wed. Apr 29th, 2026

दुचाकीचालकाचा अपघातात मृत्यू 

Bybaba maske

Jul 2, 2023

दुचाकीचालकाचा अपघातात मृत्यू 

रोखठोक न्युज वार्ताहर 

 रविवारी दुपारच्या सुमारास केज पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचोली फाटा ते चिंचोली माळी दरम्यान एका इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती आहे. केज तालुक्यातील टाकळी येथील विनायक व्यंकटी बारगजे (40) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे समजते.

रविवारी दुपारच्या सुमारास विनायक व्यंकटी बारगजे हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांचा अपघात झाला. सदरील अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नसून त्यांचा मृत्यू झाला आहे.

सदरील घटनेची माहिती मिळताच केज उपजिल्हा रुग्णालयाची 108 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि विनायक बारगजे यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सदरील अपघात नेमका कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!