• Wed. Apr 29th, 2026

गुत्तेदाराचा खून झाल्याने एकच खळबळ.

Bybaba maske

Jul 1, 2023

गुत्तेदाराचा खून झाल्याने एकच खळबळ.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 शहर पोलीस ठाणे हद्दीतील बायपास कॉर्नरला जिरेवाडी शिवारात गुत्तेदार आत्माराम उर्फ बंडू निव्रती मुंडे राहणार कन्हेरवाडी यांचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. आत्माराम मुंडे हे गुत्तेदार असून शेतकरीही होते. प्राप्त माहितीनुसार आत्माराम मुंडे हे काल रात्रीपासूनच घरून निघून गेले होते मात्र ते परत आलेच नाहीत. मात्र आज आत्माराम मुंडे यांचे बायपास कॉर्नरला शेत असून त्या ठिकाणी पत्राचे शेड आहे त्याच ठिकाणी त्यांचा खून झाला असल्याचे उघड झाले आहे. घटनास्थळी परळी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून ही घटना का व कशामुळे घडली हे अद्याप स्पष्ट आहे. या घटनेने परळी शहरात व कन्हेरवाडी गावात खळबळ माजली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत उशिरा माहिती मिळाल्याबद्दल परळी शहर पोलीस ठाण्यात अद्याप कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नाही.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!