• Fri. Jun 5th, 2026

म्हशी पाई बाप-लेकात वाद,लेकाने बापाच्या दोन्ही हातांवर कडकडून चावा.

Bybaba maske

Jul 23, 2023

म्हशी पाई बाप-लेकात वाद,लेकाने बापाच्या दोन्ही हातांवर कडकडून चावा.

रोखठोक न्युज  

गौतम बचुटे/केज :- म्हशीच्या वाटणी वरून बाप लेकांत चांगलेच भांडण पेटले. त्या वादातून चक्क मुलाने बापाला कडाडून चावा घेतला आणि आईला पण मारहाण केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे.

कर्ज तालुक्यातील टाकळी येथे ज्ञानोबा भाऊराव घुले व त्यांचा मुलगा हनुमंत ज्ञानोबा घुले हे बाप-लेक वेगवेगळे राहतात. दि. २१ जुलै रोजी ज्ञानोबा घुले यांना त्यांची म्हैस त्यांच्या दारात आढळून आली नाही; म्हणून त्यांनी तिचा शोध घेतला असता त्यांची म्हैस त्यांचा मुलगा हनुमंत घुले याच्या दारात बांधल्याचे आढळून आले. म्हणून ज्ञानोबा घुले हे त्यांचा मुलगा हनुमंत घुले याला म्हणाले की, माझी म्हैस तू का बांधलीस ? तुला जमीन वाटणी करून दिली आहे असे म्हणून ते बांधून ठेवलेली म्हैस सोडण्यासाठी गेले असता; तो वडिलांना म्हणाला की, मला म्हैस विकून कर्ज फेडायचे आहे. असे म्हणून हनुमंत घुले याने वडील ज्ञानोबा घुले यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांच्या दोन्ही हाताला कडाडून चावा घेतला. नंतर भांडण सोडविसाठी आलेल्या आईला देखील मारहाण केली.

ज्ञानोबा घुले यांच्या फिर्यादी वरून दि. २२ जुलै रोजी हनुमंत घुले या त्यांच्या मुला विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ४३९/२०२३ नुसार भा. दं. वि. ३२३, ३२४, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार सुधाकर दौंड हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!