धारूर-अंबाजोगाई येथे डेंगू च्या रूग्णाचा मृत्यू होत असताना,केज नगरपंचायत चे सत्ताधारी ठिल्या खेळात व्यस्त.
रोखठोक न्युज वार्ताहर
गेल्या आठवड्यात धारूर तालुक्यातील डेंग्यू चा एक रूग्ण केजच्या रूगणालयात उपचार घेताना मृत झाला.तर अंबाजोगाई तालुक्यातील काही खेड्यात डेंग्यू चे रूग्ण आढळून येत आहेत तसेच दोन मृत झाले आहेत.ऐवढ सगळ्या बातम्या येत असताना केज नगरपंचायत चे सत्ताधारी प्रशासन ठप्प आहे.धारूर नगरपंचायत केज पासून 13 किलोमीटर अंतरावर व नगरपंचायत 35 किलोमीटर अंतरावर असताना केज असे किती दुर आहे.त्यामुळे केज नगरपंचायत ने डेंग्यू विरोधात जनजागृती मोहीम,उपाययोजनांबाबत तात्काळ कारवाई अपेक्षित आहे.पण पाच सहा जनाची अघाडी करून अलेले सत्ताधारी कोण निधी आणतो व त्याचे श्रेय आपल्याला कसे भेटेल यातच असतात.लहान पणी पकाल्या गोट्या असायच्या शाडूच्या. सर्वाची एक गल असायची, सकाळी उठल की या चारपाच जनाची ठिल्या खेळ चालु याने त्याच्या गल्ल असते तिथ पर्यंत गोटी न्यायची मघ दुसर्याची बारी या गोट्या खेळण्याच्या नादात डेंग्यू सारखा रोग सीमे वर आलाय याची पुस्टसी कल्पना सुद्धा सत्ताधाऱ्यांना नाही.जर लवकर उपाय योजना केल्यानाहीतर मृत्यूच तांडव केज मध्ये सुद्धा बघायला भेटेल.त्या मुळे.हे सत्ताधारी उठण्या आगोदर केजच्या नागरिकांनी लगेच उपाययोजनांबाबत चर्चा करून कोरडा दिवस पाळणे गरजेच आहे.तसेच साचलेल पाणी,अडगळीतील घाण साफ करणे गरजेच आहे.