• Fri. Jun 5th, 2026

माणसांसाठी असलेल्या खाद्य गोडाऊन मध्ये डुकरांचा वावर.तर रस्त्यावर कुञ्यांचा सुळसुळाट. केज शासकीय रेशन धान्य गोडाऊनमध्ये शिरलेले वराहा नगरपंचायतचे का तहसिलचे ? शहरात ३०० पेक्षा अधिक वराह व कुत्रे च्या कुत्र्यांची संख्या यांचा तात्काळ बंदोबस्त करा- भाई मोहन गुंड

Bybaba maske

Aug 14, 2023

माणसांसाठी असलेल्या खाद्य गोडाऊन मध्ये डुकरांचा वावर.तर रस्त्यावर कुञ्यांचा सुळसुळाट.

केज शासकीय रेशन धान्य गोडाऊनमध्ये शिरलेले वराहा नगरपंचायतचे का तहसिलचे ?

शहरात ३०० पेक्षा अधिक वराह व कुत्रे च्या कुत्र्यांची संख्या यांचा तात्काळ बंदोबस्त करा- भाई मोहन गुंड

 

रोखठोक न्युज वार्ताहर 

मागील चार दिवसापूर्वी अगदी तहसील कार्यालयाच्या पाठीशी असलेले अन्नधान्य पुरवठा विभागाचे माणसांसाठी मोठे धान्य गोदाम आहे, ता ठिकाणावरून पूर्ण केज तालुक्याचा माल राशन दुकानदाराला दिला जातो. मागच्या काही दिवसापूर्वी केज शहरातील डुकरे या धान्य गोदाम मध्ये शिरल्याची फोटो व्हिडिओ व्हायरल झाले. केज तहसीलचे या गोडाऊन मधून नागरीकांना धान्य पुरवले जाते का डुकराच्या संगोपनाची जिम्मेदारी तहसील च्या पुरवठा विभागाने घेतली आहे? एवढा मोठा तहसिला कंपाउंड असताना हे वराह आतमध्ये कसे काय आले.आणि हे नेमके वराह, तहसीलचे आहेत की केज नगरपंचायतचे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यांची चर्चा शहरातील नागरीक ठिकठिकाणी करत आहेत.

खरंतर धान्य पुरवठा गोदाम मध्ये जर वराह घुसत असतील तर धान्य गोदाम रक्षक कर्मचारी काय करतात हे प्रश्न नागरिकांना पडला आहे. हि गंभीर बाब आहे, शहरामध्ये ३०० पेक्षा अधिक वराह, ४०० पेक्षा मोकार कुत्रे असून याचा बंदोबस्त नगरपंचायतने करायला हवा.अनेक वेळा निवेदन पत्र देऊन देखील यावर कारवाई होत नाही,ही लज्जास्पद गोष्ट आहे, तात्काळ मोकार कुत्रे शहरातील वराह यांचा बंदोबस्त करावा अन्यथा डुकरे आणि कुत्रे नगरपंचायत मध्ये सोडण्याचा थेट इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!