• Fri. Apr 24th, 2026

1 कोटी 33 लक्ष रूपायाच्या निधीच नगरपंचायत ने केले काय? उमरीरोडचा 98 लाख निधी वगळून बाकी रक्कम व काम गेल कुठे?

Bybaba maske

Nov 19, 2023

1 कोटी 33 लक्ष रूपायाच्या निधीच नगरपंचायत ने केले काय?

उमरीरोडचा 98 लाख निधी वगळून बाकी रक्कम व काम गेल कुठे?

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरातील अंतर्गत दलित वस्ती सुधारणा योजने खाली 2021-22 या वर्षा साठी 1 कोटी 33 लाख रूपय तत्कालीन मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले होते.त्या नंतर केज नगरपंचायत मध्ये निवडणूक होऊन सत्तांतर झाले व जनविकास आघाडीची सत्ता आली.20/3/2022 ला आलेला निधी सत्ताधारी जनविकास आघाडी ने आठ ते नऊ महिने ऐवढी मोठी रक्कम केजच्या विकासा साठी आली ही कोणालाही कळू दिली नाही.स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याच मांडी खाली दडवून ठेवली.पण काही पत्रकार बांधवाना या निधी बद्दल कळाले व त्यांनी माध्यमातून हे छापून आणले यात “रोखठोक न्युज” व “दै वादळ वार्ता” अग्रणी स्थानी होते. हा निधी येऊन 20 महिने म्हणजे दिड वर्षा पेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे तरी उमरीरोड चा काही भाग केला त्या शिवाय हा निधी अजून ही खर्च केला नाही किंवा इतरत्र कोठे काम केले हे समजून येत नाही.त्यामुळेच केज शहरातील जनतेच्या मनात शंकेची पाल चुकचुकत असुन नगरपंचायत च्या सत्ताधाऱ्यांने याचा हिशोब द्यावा किंवा मग सक्षम यंत्रणेतून याची चौकशी करून येवढ्या मोठ्या निधीच विकास न करताच काय झाल? संबंधित सत्ताधारी लोंकानी प्रशासनाला हाताशी धरून बील तर उचलले नाही ना?यांची सखोल चौकशी झाली पाहीजे कारण यातील दोन रस्ते उमरीरोड व खदिर इनामदार यांचे घर ते नावेज इनामदार यांचे घर यांचे काम आमदार नमिताताई मुंदडा यांनी मंजूर केलेल्या नगरोत्थान योजनेच्या 76 कोटी आलेल्या निधीतून काम होत आहे तर मग खदिर इनामदार ते नावेज इनामदार यांचा वार्ड क्रमांक आठ(8)मध्ये आलेला निधी काय केला? तसेच वार्ड क्रमांक आठ(8) मध्येच कंळब रोडवर ते सज्जाद इनामदार ते फैजुदीन इनामदार या रस्त्याचा निधी काय केला? या सर्वाचे उत्तर पाहिजे असेल तर सत्ताधारी व मुख्याधिकारी नगरपंचायत केज ची चौकशी झालीच पाहीजे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!