• Fri. Apr 24th, 2026

यश कन्स्ट्रक्शन व नगरपंचायत चा प्रताप, रस्ता प्रस्तावित नसताना भलत्याच ठिकाणी रस्ता बनवला. बड्या नगरसेवकच्या प्लांटीग साठी रस्ता बनवला असल्याची चर्चा ? आंधळ दळतय कुत्र पिठ खातय अशी शहराची अवस्था!!

Bybaba maske

Nov 21, 2023

यश कन्स्ट्रक्शन व नगरपंचायत चा प्रताप, रस्ता प्रस्तावित नसताना भलत्याच ठिकाणी रस्ता बनवला.

बड्या नगरसेवकाच्या प्लांटीग साठी रस्ता बनवला असल्याची चर्चा ?

आंधळ दळतय कुत्र पिठ खातय अशी शहराची अवस्था!!

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरात महाराष्ट्र सुवर्ण महोत्सव नगरोत्थान योजनेंतर्गत 76 कोटीचे कामे चालु आहेत या मध्ये

1)केज येथे रा.म.मा. ते सार्वजनिक स्मशानभूमी, कानडी रोड नगर पंचायत हद्दीपर्यंत सिमेंट कॉक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे ता. केज जि.बीड

2 )केज येथे येडबा रोडे यांचे घर ते खुर्शीदभाई यांचे प्लॉटपर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे ता. केज जि. बीड

3)केज येथे टिपू सुलतान चौक कळंब रोड ते फैजुदीन यांची विट भट्टीपर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे ता.केज जि.बीड

4)केज येथे कानडी रोड ते येडबा रोडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे ता. केज जि.बीड

5)केज येथे बीड परळी रोड ते मंगळवार पेठ-आंबेडकर चौकपर्यंत ते पोस्ट ऑफिस सिमेंट काँक्रीट रस्ता करणे ता.केज जि.बीड

ऐवढे कामे प्रस्तावित असताना व ऐवढ्याच कामा साठी शासनाने निधी दिला असता व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत याच कामाचा कार्यारंभ आदेश असताना.नगरपंचायत ने दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्रात सुद्धा या कामाचा उल्लेख नसताना जुना कळंब रोड म्हणजे नगरपंचायत ते कळंब रोड हा नवीन च मार्गावर रस्ता नाली बांधकाम चालु केले आहे त्यात या रस्त्यावरची नाली बांधकाम बांधून पुर्ण झाली आहेत जिथे फक्त इलेक्ट्रिक पोल आडवे आलेत तिथेच काम केले नाही.केज शहरातील इतर सर्वे कामे हळूवार पद्धतीत चालू असताना या रस्त्याची 90% टक्के नाली बांधकाम व रोड खोदून दबाई झाली आहे.केज शहरात इतर ठिकाणी रस्ते नाहीत काही ठिकाणी तर जनतेचे अक्षरशा हाल आहेत.जिथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती तेव्हा पासून रस्ते नाहीत तरी या रस्त्याचा घाट कश्या साठी घातला हे जनतेला अश्चर्य वा नवल वाटण्या सारखेच आहे.कांही जनतेच्या म्हणण्यानुसार येथे केज नगरपंचायत च्या बड्या नगरसेवकाची प्लांटीग असल्याने व बर्‍याच काळा पासून ग्राहक नाहीत त्या मुळे रस्ता झाल्यावर प्लांटीग विकली जाईल या कारणाने येथे कुठलाही निधी नसताना किंवा कधीही काम प्रस्तावित नसताना हा रस्ता केला जात आहे.यश कन्स्ट्रक्शन ला शासनाने मंजूर केलेल्या ठिकाणी व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दिलेल्या कार्यारंभा नुसार व नगरपंचायत ने दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्र नुसार काम न करता हे काम करता येते का?का समाज सेवा म्हणून यश कन्स्ट्रक्शन हा रस्ता बनवत आहे?या रस्त्यावर किती निधी मंजूर झाला?कामाचे ईटेंडर निघले होते का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे?अशी केजची जनता भुमीका घेत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!