• Fri. Apr 24th, 2026

केजच्या पत्रकारांनी केले वनक्षेत्रपाल वनविभागच्या कार्यालयाचे स्टींग ऑपरेशन.कर्मचार्‍यानी महापुरुषांच्या प्रतिमा आडगळीला ठेवून केला अवमान ; पोलिस उपनिरक्षक राजेश पाटील यांनी केला पंचनामारोखठोक न्युजने एक वर्षापूर्वी केले होते.तरी पण एक वर्षात प्रतिमा लावल्या नाहीत. किती ही माजूरी?पाच पैकी एकही कर्मचारी नाही जाग्यावर ; हालचाल रजिस्टर वार्‍यावरकार्यालयात काचेचे क्लास आले आढळून तर पाणी पिण्यासाठी स्टिलचे ग्लास वेगळे ; कार्यालय आहे कि हॉटेल – सर्वदूर चर्चा

Bybaba maske

Nov 21, 2023

केजच्या पत्रकारांनी केले वनक्षेत्रपाल वनविभागच्या कार्यालयाचे स्टींग ऑपरेशन.

कर्मचार्‍यानी महापुरुषांच्या प्रतिमा आडगळीला ठेवून केला अवमान ; पोलिस उपनिरक्षक राजेश पाटील यांनी केला पंचनामा

रोखठोक न्युजने एक वर्षापूर्वी केले होते.तरी पण एक वर्षात प्रतिमा लावल्या नाहीत. किती ही माजूरी?

पाच पैकी एकही कर्मचारी नाही जाग्यावर ; हालचाल रजिस्टर वार्‍यावर

कार्यालयात काचेचे क्लास आले आढळून तर पाणी पिण्यासाठी स्टिलचे ग्लास वेगळे ; कार्यालय आहे कि हॉटेल – सर्वदूर चर्चा

रोखठोक न्युज वार्ताहर 

 महाराष्ट्र शासनानाने वेळोवेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचारी यांना वेळोवेळी सुचना देण्याचे आदेशीत करणारी परिपत्रके निर्गमीत केली आहेत तसेच त्यांची कर्तव्य देखील सांगीतलेली आहेत त्यापैकी मानवी, नैसर्गिक आणि संबंधित नुकसानांपासून जंगलाचे संरक्षण , वनांची निर्मिती, देखभाल आणि सुधारणेद्वारे जंगलाचे वैज्ञानिक व्यवस्थापक, सिल्व्हिकल्चरल ऑपरेशन आणि सरकारी महसूल गोळा करणे. रोपवाटिका आणि वृक्षारोपण इत्यादीमध्ये वनीकरणाची कामे ,कार्यालयांचे व्यवस्थापन आणि मानव संसाधन विकास. यासह आदि गोष्टींची जबाबदारी दिलेली आहे मात्र केज वनविभागातील अधिकारी कर्मचारी शासकीय आदेशाची, जबाबदाऱ्याची पायमल्ली करताना पत्रकारांच्या जागरुकतेमुळे निदर्शनास आले आहे.रोखठोक न्युजने एक वर्षापूर्वी केले होते.तरी पण एक वर्षात प्रतिमा लावल्या नाहीत. किती ही माजूरी?

या बाबत सविस्तर माहिती अशी कि केज शहरामध्ये केज- बीड रोडवर शिक्षक कॉलनी येथे असणारे वनपरिक्षेत्रपाल , वनविभाग कार्यालय आहे. या कार्यालयात एकुण पाच कर्मचारी आहेत मात्र सदरील कार्यालयातील एकही कर्मचारी कार्यालयामध्ये हाजर राहात असलेला दिसुन आलेला नाही असे स्थानिक रहिवाश्यांन कडुन वारंवार माहिती मिळाल्या अंती केज येथील १० ते १२ पत्रकारांनी दि २० नोव्हेंबर रोजी दुपारी ०३ वाजता वनविभाग कार्यालयात दाखल झाले . कार्यालयामध्ये वनमजुर सोडता ना शिपाई ना अधिकारी ना कर्मचारी कोणीही आढळुन आले नाही . सदरील वनमजुरास चौकशी केली असता ” मी असे अधिकारी , कर्मचारी कोठेही पाहिले नाहीत ” असे उत्तर मिळाले. त्यातच कार्यालयामध्ये वनमजुर यांच्या सोबतीने पाहणी केली असता भारताच्या थोर महापुरुषांच्या प्रतिमा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या टेबलाच्या खालच्या उजव्या बाजुस धुळखात असलेल्या निर्देशनास आल्या तर कांही प्रतीमा हॉलमधील खिडकीमध्ये अस्ताव्यस्त धुळखात पडलेल्या अवस्थेत निर्देशनास आल्या त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज , माँ जिजाऊ साहेब , महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , संत गाडगे महाराज आदि महापुरुषांच्या प्रतिमा निर्देशनास आल्या नंतर केजचे तहसिलदार तसेच केजचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना पत्रकारांनी भ्रमरध्वनी वरून संपर्क साधला असता तात्काळ पोलिस उपनिरक्षक राजेश पाटील

वनविभाग कार्यालयात दाखल झाले त्यांनी सदरील कार्यालयातील महापुरुषांच्या प्रतीमा ठेवलेल्या जागेचा पंचनामा केला. त्याच बरोबर याच कार्यालयात एका खिडकीमध्ये काचेचे क्लास वेगळे तर पाणी पिण्यासाठी स्टिलचे ग्लास वेगळे मांडलेले निर्देशनास आले. यावरून या कार्यालयतील अधिकारी कर्मचारी काय करत असतील ? हे कार्यालय वनविभागचे आहे कि कोणते हॉटेल आहे ? याचीच परिसरातील नागरीकांत चांगलीच चर्चा रंगु लागली आहे. या आश्या मग्रुर अधिकारी , कर्मचार्‍यावर प्रशासन कारवाई करेल का ? महापुरुषांच्या आडगळीत ठेवलेल्या प्रतीमा भिंतीवर सन्मान पुर्वक लावल्या जातील का ? केज येथील वनविभागाचा कारभार सुधरेल का ? आदि प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडले आहेत.

तर केज येथील पत्रकारांनी वनविभागाचे केलेल्या स्टिंग ऑपरेशन मुळे केज येथील पत्रकारांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!