• Fri. Apr 24th, 2026

शेतकऱ्याच्या घरी भरदिवसा १,२४,००० चोरी.

Bybaba maske

Nov 23, 2023

शेतकऱ्याच्या घरी भरदिवसा १,२४,००० चोरी.

रोखठोक न्युज
केज (प्रतिनिधी)-तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंचपुर येथील शेतकरी ज्ञानोबा बापुराव साखरे यांच्या घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले नगदी रक्कम व सोन्याचे दागीने अशा एकुन एक लाख चौवीस हजार रुपयांची चोरी अज्ञात व्यक्तीने केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली असुन या चोरीचा तपास सहाय्यक फौजदार राठोड हे करीत आहेत.

केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंचपुर येथील शेतकरी ज्ञानोबा बापुराव साखरे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने व नगदी असा एकुन १,२४,००० रू माल अज्ञात चोरटयाने चोरून नेला आहे म्हणून गुन्हा दाखल गेला माल-सोन्याचे दागीने कि.अं ९०००० रू व नगदी रु ३४००० रू असा एकुन १२४००० रू ऐवज चोरी मंगळवार दि. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली असुन ज्ञानोबा बापुराव साखरे यांच्या फिर्यादी वरुन युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुरनं २४८/ २०२३ कलम ४५४,३८०, भादवी नुसार गुन्हा नोंद झाला असुन युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्नाखाली सहाय्यक फौजदार राठोड हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!