पंकज कुमावत यांच्या बदलीला स्थगिती दिल्याचा सामन्यांमध्ये रोष.
तर दोन नंबर वाले केज मध्ये खुश तर अंबाजोगाईचे गम मध्ये होते.
जादुची कांडी कोठून फिरली?
रोखठोक न्युज
बीड जिल्ह्यात एक कर्तव्यदक्ष आणि खमक्या पोलीस अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांची तीन दिवसांपूर्वी अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्तीच्या ४८ तासातच पोलीस महासंचालकांनी पंकज कुमावत वगळता बदली झालेल्या इतर अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले आहेत. पंकज कुमावत यांचे काय करायचे याबाबत काहीच निर्देश नसल्याने त्यांच्या बदलीला स्थगिती दिल्याची चर्चा असून या संदर्भाने सामन्यांमध्ये मात्र रोष आहे. एका चांगल्या अधिकाऱ्याला काम करू द्यायचे नाही का ? अशी चर्चा नागरिक करीत आहेत.
आयपीएस अधिकारी असलेल्या पंकज कुमावत यांची परिविक्षा काळात केज येथे सहायक पोलीस पोलीस अधीक्षक
म्हणून नियुक्ती झाली होती. त्या काळात त्यांनी जिल्हाभरात दबदबा निर्माण केला. अनेक मोठ्या कारवाया कुमावत यांनी केल्या. यामुळे अवैध धंदे करणारांमध्ये कुमावत यांच्याबद्दल धडकी बसलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये पंकज कुमावत यांची तीन दिवसांपूर्वी अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक झाली होती. मात्र आता त्यांना या पदाची सूत्रे घेण्यासाठी कार्यमुक्त न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात काहींना पंकज कुमावत यांच्यासारखा अधिकारी नको आहे का? असा सवाल विचारला जात आहे. पंकज कुमावत हे धाडशी अधिकारी असून ते दबावात येत नाहीत असा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे मग असा अधिकारी काहींना जिल्ह्यात नको आहे का? आणि नेमका कोणाला नको आहे याच्याच चर्चा सध्या जोरात सुरु आहेत.