या बाबत सविस्तर वृत्तांत असा की दिनांक 29/3/2022 रोजी एक कोटी 33 लक्ष रूपय केज मधील 4 रस्ता,नाली बांधकामा साठी मंजूर झाला त्यातील 20 लक्ष रुपयाचा निधी वार्ड क्रमांक आठ(8) मधील खदिर इनामदार यांचे घर ते नावेज इनामदार यांच्या घरापर्यंत रस्ता,नाली बांधकामा साठी तांत्रिक मान्यता क्रमांक 343- 21/01/2022 या नुसार मंजूर झाले होते.नगरपंचायत ने ईटेंडर च्या माध्यमातून टेंडर काढून गुत्तेदारास काम दिले होते पण गुतेदाराने 10/15 मिटरची नाली बांधकाम करून पोबारा केला आहे.या संदर्भात मुख्याधिकारी यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला असता ते बाहेर गावी असल्याच समजल,तसेच त्यांच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता मी मिंटीग साठी बाहेर गावी आहे,मी तुम्हाला चौकशी करून सांगतो.म्हणजेच 20 लक्ष रूपय ही लहान रक्कम असल्या सारखी, नगरपंचायतचे मुख्यधिकारी या प्रकरणा पासुन अनभिज्ञ असल्याचे लक्षात आले.जर विकासाच्या गप्पा मारून आलेल्या जनविकास आघाडीच्या सर्वेसर्वा यांना स्वतःच्या पत्नी च्या वार्ड क्रमांकात काम करून घेणे होत नसेल तर त्यानी पुर्ण केज शहराचा इशार कसा घेऊ शकतात?असा प्रश्न आता केज शहरात चर्चिला जात आहे.गेल्या दोन वर्षांपासून जर काम होत नसेल तर यात दोषी कोण? मुख्याधिकारी जर त्याना यातल काहीच माहिती नसेल तर ते नगरपंचायत चे खरेच मुख्यधिकारी म्हणून काम करतात का नगरपंचायत वाऱ्यावर सोडली आहे.20 लक्ष रूपया साठी जर हे गंभीर नसतील तर कसे चालणार? या 20 लक्ष रूपयाचे काम का झाले नाही याची चौकशी होणे गरजेच आहे.का काम न करताच गुत्तेदाराने बील उचलले याची चौकशी झाली पाहिजे असे आता वार्ड क्रमांक आठ चे नागरिक म्हणत आहेत.